News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल – मुल बसस्थानक येथे श्री.रामभक्त हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी आपल्या मातोश्री कमलादेवी चंदनसिंह रावत यांचे स्मुर्ती प्रित्यर्थ बस स्थानकावर अनेक वर्षापूर्वी हनुमान मंदिराची स्थापना केली. Hanuman jayanti 2023
तेव्हा पासूनच दरवर्षी हनुमान जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने थाटामाटात साजरा केल्या जात असून भाविकांचे एक श्रद्धास्थान बनले आहे. मुल बसस्थानकावर मुल शिंदेवाही पोभूर्णा सावली चंद्रपूर गडचिरोली ब्रम्हपुरी, चामोर्षी, गोंडपीपरी जाणारे येणारे हजारो भाविक श्री हनुमान मूर्तीचे दर्शन घेत आहेत. आज हनुमान जयंती निमित्त सकाळी ७-०० वाजता मंदिर समिती प्रमुख रुपलसिंह रावत यांचे शुभ हस्ते व संतोषसिंह रावत यांचे प्रमुख उपस्थितीत मिश्रा महाराज यांचे मंत्रोपचारने मूर्ती पूजन महा अभिषेक करण्यात आले.
यानिमित्त सी.डी.सी.सी. बँकेचे सीईओ कल्यांनकुमार यांनीही श्री. हनुमानाचे दर्शन घेतले. नंतर भजन, काला आणि ११-३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. महाप्रसादाचे दाते संतोष सिंह रावत यांनी स्वतः महाप्रसादाचे वाटप हाती घेतले त्यांच्या हाताला हातभार लावण्याचे सहकार्य, रूपल रावत, दीपक रावत, ऐशवर्या रावत, मंदिराचे पुजारी महाराज केशव गुज्जनवार, समितीचे लोमेश नागपुरे, सुनील मंगर,किशोर गुज्जनवार, छोटू रावत, होड्डाजी, संजय टिकले, सुमितसिंह बिष्ट, धवल जैन, प्रविन खानोरकर, तेजस महाडोळे, चतुर मोहूर्ल, शुभम येनुरकर, अंकुश ध्यांनबोइंवार, चेतन कावळे, कमलेश रामटेके, अजय झाडे, सोमा नागपुरे, पंकज लाडवे, निखिल पांडव, यांचेसह हनुमान मंदिर समितीचे अनेक कार्यकर्ते यांनीही ४००० हजार भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात सहकार्य केले. हनुमान जयंती उत्सव दिना निमित्त आलेल्या समस्त भाविकांना व जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना महाप्रसादाचे वाटप केल्याने आयोजकांप्रती भक्तजनानी आभार व्यक्त केले आहे.