हत्तीला वाचविण्यासाठी मुंगीचा बळी?

IPL चे सट्टेबाज अजूनही अटकेबाहेर

News34 chandrapur

चंद्रपूर – इंडियन प्रीमिअर लीग चे क्रिकेट सामने सुरू होताच, सट्टेबाज सुद्धा क्रिकेटच्या बाहेरील मैदानात सक्रिय झाले असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल हे क्रिकेट बुकीं करीत आहे. Ipl gambling

मागील काही दिवसांपासून News34 ने क्रिकेट सट्टेबाज यांच्या बातम्या प्रकाशित केल्या होत्या, अनेक दिवस उलटूनही चंद्रपुर पोलिसांनी यावर काही कारवाई केली नव्हती, अखेर इतक्या दिवसांनी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचा मुहूर्त मिळाला.

तुकुम परिसरात KKR vs RCB यांच्यात क्रिकेट सामना सुरू असताना देविदास पडगीलवार व अविनाश हांडे हे दोघे लाईव्ह मॅच दरम्यान क्रिकेटवर सट्टा लावत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याठिकाणी धाड मारली मात्र त्याठिकानाहून अविनाश हांडे ने पळ काढला. Indian premier league 2023

स्थानिक गुन्हे शाखेने मोबाईल, टीव्ही, नगदी रक्कम असा एकूण 30 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी अतुल कावळे, संजय आतकुलवार, संतोष एलपूलवार, नितीन रायपूरे, गोपाल आतकुलवार, नरेश डाहूले, कुंदन बावरी व रवींद्र पंधरे यांनी केली. Lcb chandrapur
सध्या स्थानिक गुन्हे शाखा अंचलेश्वर गेट परिसरातील ताडबन भागात राहणारा आरोपी अविनाश हांडे याचा शोध घेत आहे.

पोलिसांची ही कारवाई म्हणजे मोठ्या पहाडावर दगड तोडण्याचे काम आहे, कारण या अवैध धंद्यातील मुख्य म्होरक्या सिराज, चंद्रपुरातील 2 म्होरके राजीक व महेश हे अजूनही अटकेच्या बाहेर आहे.

या क्रिकेट सट्या वर संपूर्ण नियंत्रण नागपुरातील सिराज चे आहे, त्याने Nice pro, 7777, fun याप्रकारच्या तब्बल 12 आयडी व वेबसाईट तयार केल्या असून हा धंदा ऑनलाइन पध्दतीने चंद्रपुरातील राजीक व महेश चालवीत आहे.

आयपीएल क्रिकेटच्या या अवैध व्यापारात पंटर चे पैसे आयडी मधून लंपास करण्याचे काम सुद्धा सुरू झाले आहे, 2 दिवसांपूर्वी एका पंटरचे 19 लाख रुपये आयडीमधून लंपास झाले होते आता पुन्हा 2 पंटर चे लाखो रुपये आयडी मधून गहाळ करीत त्याची हिस्ट्री सुद्धा डिलीट करण्यात आली आहे.

चंद्रपुरात हे क्रिकेट सट्टेबाज मोठं नेटवर्क निर्माण करीत हे काम कसे करू शकतात? असा प्रश्न असंख्य सुजाण नागरिकांना पडत असेल, यामागचं कारण म्हणजे नागपुरात बसलेला सिराज यांच्यावर काही अधिकाऱ्यांचं असलेलं अफाट प्रेम याला कारणीभूत आहे, याबाबत news34 कडे विश्वसनीय माहिती सुद्धा मिळाली आहे, तो अधिकारी कोण? कुणाच्या माध्यमातून हा सर्व व्यवहार होत आहे? इतक्या दिवसानंतर ही कारवाई झाली कशी? याबाबत लवकर आम्ही खुलासा करणार आहोत.

चिल्लर सट्टेबाजावर कारवाई करण्यापेक्षा पोलिसांनी तात्काळ सिराज, राजीक व महेश यांच्या मुसक्या आवळायल्या हव्या अन्यथा हत्ती ला वाचविण्यासाठी मुंगीचा बळी ही म्हण पोलिसांच्या कारवाईवर सिद्ध होणार.