News34 chandrapur
चंद्रपूर – IPL च्या 16 हंगाम सुरू होताच क्रिकेट बुकीं सक्रिय झाले होते, या मोठ्या समुद्रात असलेल्या माश्यानी आपले जाळे पसरवीत काम सुरू केले मात्र आठवडाभरानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी पोलीस विभागांना कठोर कारवाईचे आदेश दिले. Ipl gambling
आयपीएल सुरू झाल्यावर सतत जिल्ह्यात सुरू असलेल्या क्रिकेट सट्टेबाजांवर News34 ने वृत्त प्रसारित केले होते, वृत्त प्रकाशित झाल्यावर पोलिसांनी दखल घेत कारवाईचे धाडसत्र सुरू केले.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी कारवाईचे धाडसत्र सुरू करीत लागोपाठ 4 कारवाया केल्या.
यामध्ये लाखोंचा मुद्देमाल व अनेक क्रिकेट बुकींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. Cricket gambling
8 एप्रिलला उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या नेतृत्वाखाली पडोली पोलीस व शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत क्रिकेट सट्टेबाजांवर मोठी कारवाई करण्यात आली असून यामध्ये मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे, या कारवाई पोलिसांना मुंबई, पुणे हैद्राबाद व दुबई चे कनेक्शन आढळल्याची माहिती आहे. Live IPL match
सायंकाळी दिल्ली कॅपिटल व राजस्थान रॉयल्स च्या लाईव्ह मॅच दरम्यान पडोली येथे मोबाईल शॉप समोर गुरुमुख आहुजा हा उभा राहून सट्टा घेत होता, पोलिसांना याबाबत माहिती मिळताच तात्काळ गुरुमुख ला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेण्यात आली असता, त्याच्या मोबाईल वर आयडी मिळाली ती कुणाची आयडी आहे याबाबत विचारले असता आरोपी गुरुमुख ने सदर आयडी विजय आहुजा यांची असल्याचे सांगितले.
पडोली पोलिसांचे पथक आरोपी विजय ला अटक करण्यासाठी गेले असता तो पसार झाला, पोलीस विजय उर्फ धीरु च्या मागावर आहे.
दुसऱ्या कारवाई शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील छोटा बाजार चौक परिसरात माउंट कारमेल निवासी सैय्यद इम्रान अली हा चेन्नई विरुद्ध मुंबई सामन्यावर सट्टा घेत होता, याबाबत शहर पोलीस ठाण्याच्या चमुला माहिती मिळताच त्यांनी तात्काळ आरोपीला अटक केली असता सदर आयडी बद्दल विचारणा केल्यावर ती आयडी सुमित जांगड याची असल्याचे सांगितले.
सध्या आरोपी जांगड हा पसार झाला आहे.
शहर पोलिसांना आरोपी सैय्यद इम्रान अली याच्या मोबाईलवर सर्वात जास्त वापरल्या जाणारी महादेव व लोट्स247.com या आयड्या मिळाल्या आहे.
सदर आयडी ह्या क्रिकेट सट्टा लावणाऱ्यांसाठी वरदान आहे, ह्या आयडी पुणे, हैद्राबाद व दुबई वरून ऑपरेट होत असल्याची माहिती आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या क्रिकेट सट्टेबाजाविरोधात धडक कारवाईच्या भूमिकेने सर्वांचे धाबे दणाणले आहे.
पोलीस कारवाई करतील या भीतीने सध्या बुकीं क्षेत्रातील मोठे मासे तेलंगणा, गोवा, मध्यप्रदेश, बालाघाट, मुंबई, पुणे भागात पसार झाले तर काही देवदर्शन तर काही पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर गेले आहे.
सध्या जिल्ह्यात फक्त पंटर क्रिकेट बुकींची भूमिका पार पाडत आहे, क्रिकेट बुकीं क्षेत्रातील मोठ्या खेळाडूंनी आपले मोबाईल सुद्धा बंद केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी पोलीस विभागाला आदेश देत सदर नेटवर्क उध्वस्त करण्याचे निर्देशित केले आहे, सोबत lcb ने सुद्धा कंबर कसली असून कारवाईचे धाडसत्र सुरू केले आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलीस दल क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या शेवटच्या आरोपी पर्यंत पोहचण्याचे प्रयत्न करीत आहे, मात्र आजच्या घडीला क्रिकेट बुकिंचा मोठा मासा पडोली क्षेत्रात सक्रिय झाला असून तो लाला नावाने धंदा करीत आहे.
त्याच्या मुसक्याही पोलीस आवळणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या जिल्ह्यात आतापर्यंत पोलिसांनी क्रिकेट बुकिंवर 6 कारवाया केल्या आहे.
क्रिकेट सट्टेबाजांवर करण्यात आलेली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार व पडोली पोलीस निरीक्षक सुनीलसिंग पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.