IPL CRICKET सट्टेबाजांवर चंद्रपूर पोलिसांची सुसाट कारवाई

सट्टेबाजांना पोलिसांचा धाक

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर शहरात आयपीएल क्रिकेट सट्टेबाजांचे नेटवर्क उध्वस्त करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने मोहीम राबवित दररोज कारवाईचा सपाटा लावला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेनंतर रामनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने लागोपाठ क्रिकेट सट्टेबाजांवर कारवाई केल्याने हा अवैध जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. Ipl cricket 2023 betting

9 एप्रिलला सुरू असलेल्या लाईव्ह मॅच दरम्यान सट्टा खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे शहरातील हवेली गार्डन परिसरात 23 वर्षीय रोहन प्रकाश कांबळे याला गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले.

आरोपी रोहन जवळ 2 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विशेष म्हणजे त्याच्याजवळ मिळालेल्या आयडी मध्ये 1 लाख रुपये क्रेडिट करण्यात आले होते, सदर आयडी हवेली गार्डन परिसरात राहणारा अरबाज कुरेशी याची असल्याची माहिती मिळाली मात्र सध्या अरबाज हा पसार झाला आहे, पोलीस त्याच्या मागावर आहे.

रामनगर पोलिसांच्या दुसऱ्या कारवाईत वरोरा तालुक्यात राहणारे युवक चंद्रपूर शहरात मिळून IPL CRICKET वर Gambling खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

विशेष म्हणजे आरोपी हे की एका फ्लॅट मधून क्रिकेट वर सट्टा घेत होते, रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने नागपूर रोडवरील विदर्भ प्लॉट येथे धाड मारली असता त्याठिकाणी लाईव्ह सामन्यावर आरोपी मोबाईल द्वारे सट्टा घेत होते.

पोलिसांनी यावेळी 34 वर्षीय आसिफ रहीम शेख, 32 वर्षीय रवी मोहन गंधारे, 33 वर्षीय दिनेश लक्ष्मण कोल्हे, 25 वर्षीय गणेश नंदकिशोर जानवे सर्व राहणार वरोरा यांना ताब्यात घेतले.

आरोपिकडून 4 मोबाईल, लॅपटॉप, आयडी ज्यामध्ये 7 लाख रुपयांच्या वर पैसे क्रेडिट करण्यात आले होते, पोलिसांनी एकूण 14 लाख 22 हजार 375 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी माजरी येथे राहणारा आरोपी छोटू उर्फ रूपंचंद यादव हा पसार झाला.

दोन्ही कारवाई मधील आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक राजेश मुळे, गुन्हे शोध पथकाचे सपोनि हर्षल एकरे, पोउपनी विनोद भुरले व गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.