शिवानी वडेट्टीवार यांना सावरकरांच्या नातूने दिले आव्हान

कांग्रेसच्या गोटात सावरकरांच्या वक्तव्यावरून नवा वाद पेटणार

News34 chandrapur

चंद्रपूर – 12 एप्रिलला चंद्रपुर शहरात युवक कांग्रेसने बेरोजगारी च्या मुद्द्यांवर आंदोलन केली त्यानंतर माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या प्रदेश युवक कांग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार यांनी जाहीर सभेत सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली.
याबाबत चा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. Shivani vadettiwar congress
आधीच राज्यातील कांग्रेसमध्ये सावरकरांवरून अनेक मतभेद दिसून आले.

आता शिवानी वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे कांग्रेस पक्षात अजून काय नवा वाद होणार हे येणारी वेळच सांगेल.

त्या म्हणाल्या की सावरकर यांचे महिलांबद्दलचे विचार म्हणजे बलात्कार हे राजकीय हत्यार आहे, ते राजकीय विरोधात वापरायला हवे.
या विचारामुळे महिलांना भीती वाटत असल्याचेही त्या बोलताना दिसून येत आहे. या व्हिडीओमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

शिवानी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा अनेकांनी समाचार घेतला असून सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी याबाबतचं चॅलेंज दिलं आहे.

सात्यकी सावरकर यांनी शिवानी वडेट्टीवार यांना खुलं आव्हान दिलं आहे. “शिवानी वडेट्टीवार यांनी केलेला दावा चुकीचा आहे. सावरकरांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांनी तसं स्टेटमेंट शोधून दाखवावं”, असं चॅलेंज सात्यकी सावरकर यांनी दिलं आहे.

“हे मुद्दाम टार्गेट केलं जातंय. याला दुसरं तिसरं काही कारण नाही. एकतर यांनी अभ्यास केलेला नाही. पूर्ण वाचलेलं नाही. यांचे सल्लागार मंडळ सांगतात की, सावरकरांनी असं असं लिहिलेलं आहे. पण त्यांनी स्वत: पडताळून पाहिलं नाही. सावरकर हे हिंदुत्ववादी नेते होते. महाराष्ट्रात आणि देशात हे हिंदुत्ववादी सरकार आहे जे सावरकरांच्या विचारांच्या जवळ जाऊ शकतं. ज्यांची हातातून सत्ता गेली आहे, कुणाचं तरी लांगुलचालन करुन सत्ता परत मिळावी या केवळ राजकीय लाभापोटी सावरकरांना लक्ष केलं जातंय”, असं सात्यकी सावरकर म्हणाले.