चंद्रपूर जिल्ह्यात एका चपलेने 2 युवकांचा मृत्यू

डीजे वाजवायला निघाले आणि ठार झाले

News34 chandrapur

चंद्रपूर/मूल – विठ्ठलवाडा येथील कार्यक्रमात DJ वाजविण्यासाठी जात असलेल्या वाहनाचा अपघात झाल्याने दोघांचा मृत्यू तर 4 गंभीर जखमी झाले आहे, सदर घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

पोम्भूर्णा मार्गावरून युवक चारचाकी वाहनाने विठलंवाडा येथे डीजे वाजविण्यासाठी निघाले होते. युवकांचे चारचाकी वाहन क्रमांक MH34AV0983 हे चितलधाबा मार्गावरील सोनापूर फाट्याजवळ जात असताना अन्य वाहनांना मार्ग देत होते, मात्र त्यावेळी चालकाची चप्पल एक्सलेटर मध्ये अडकल्याने चालकाचे वाहनवरून नियंत्रण सुटले.

अनियंत्रित झालेले वाहन थेट झाडावर आढळले, धडक इतकी जोरदार होती की यामध्ये 1 युवक जागीच ठार झाला तर दुसरा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत पावला.

मृतकांमध्ये डीजे ऑपरेटर भाजप महिला अध्यक्ष वैशाली बोलमवार यांचा 23 वर्षीय लहान मुलगा आनंद बोलमवार, 21 वर्षीय अमन भोयर यांचा समावेश आहे.

तर जखमीं युवकांमध्ये 21 वर्षीय गोलू देशमुख, 20 वर्षीय लक्ष्मण बावनकर, चालक 25 वर्षीय गीतेश्वर बावणे व 17 वर्षीय आयुष लाकडे यांचा समावेश असून जखमींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.