चंद्रपुरात पोलिसाने केली पोलिसाच्या मुलाला अमानुष मारहाण

पोलिसांचा मुलगा पोलिसांना न्याय मागतोयं

News34 chandrapur

चंद्रपूर – खाकी म्हटलं की चांगल्या चांगल्या लोकांमध्ये कायद्याची दहशत निर्माण होते, मात्र जेव्हा ही खाकी, खाकी वरचं आपली दहशत निर्माण करीत असेल तर काय म्हणावं? Chandrapur police

पण अशी एक घटना चंद्रपूर शहरात 15 एप्रिलला घडली, शनिवार 15 एप्रिल रात्रीचे 8.45 वाजले असतील त्यावेळी राधाकृष्ण टॉकीज परिसरात काही युवक गप्पा मारत बसले होते.
त्यावेळी रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रोशन इरपाचे हे आपल्या 3 कर्मचाऱ्यासहित त्या परिसरात पोहचले.
इरपाचे यांनी बसलेल्या युवकांना हटकत तुम्ही इथे काय करीत आहात अशी विचारणा करीत उद्धट बोलायला सुरवात केली.
त्याठिकाणी बसलेले 23 वर्षीय रितीज संजय नगराळे यानी आम्ही बसून आहो असे सांगितले मात्र इरपाचे यांनी युवकांना हात पुढे करायला लावत शिवीगाळ करीत त्यांच्या हातावर दांड्याने मारले. Ramnagar police station chandrapur
रितीज सोबत असलेल्या दोन मित्रांना सुद्धा हात व तळहातावर दंडयाने मारले, तिघांना शिवीगाळ करीत नाटक कराल तर पोलीस स्टेशनला घेऊन जाईल अशी धमकी देत युवकांना 2 हजार रुपयांची मागणी केली.
रितीज ने इरपाचे यांची माफी मागितली मात्र ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर सुद्धा युवकांनी माफी मागत, पुढे याठिकाणी येणार नाही असे म्हणाले.
कुणी माझी माफी मागितली तर मला राग येतो असे उदगार इरपाचे यांनी काढले. तुम्ही माजले काय? तुमच्या बापाला कॉल करा, काय करतो तुझा बाप?
यावर रितीज म्हणाला की सर माझे वडील सुद्धा पोलीस मध्ये आहे मी त्यांना कॉल करतो आपण त्यांच्याशी बोलून घ्या असे म्हटले, रितीज ने वडिलांना कॉल केला त्यावर रितीज च्या वडिलांनी त्यांना फोन द्या असे म्हटले, रितीज च्या वडिलांशी बोलून इरपाचे जायला निघाले, मात्र जाता जाता रितीज व इरपाचे यांनी एकमेकांकडे बघत स्मितहास्य करू लागले, यावर इरपाचे यांना राग आला व तुम्ही माजले काय, मुजोरी करीत आहात म्हणून रितीज ला इरपाचे हे लाथा बुक्क्यांनी मारहाण करू लागले.
त्यानंतर इरपाचे इतक्यावर थांबले नाही, सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातातील दांडा घेत रितीज च्या हाता, पायावर व पृष्ठभागावर जोरजोरात मारू लागले.
या मारहानीत रितीज च्या हातावर पायावर व पृष्ठभागावर जखमेचे व्रण उमटले, मारहाण झाल्यावर तिघांना पोलीस स्टेशनला या म्हणाले मात्र एका पोलीस कर्मचाऱ्याने हा एरिया आपल्या हद्दीत येत नाही असे सांगितले व तिथून निघून गेले. सदर बाब ही रितीज ने लेखी स्वरूपात दिलेल्या तक्रारीत आहे.
या प्रकरणी विशेष बाब म्हणजे पोलीस उपनिरीक्षक रोशन इरपाचे हे रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे, मात्र त्यांनी आपल्या पोलीस स्टेशनची हद्द ओलांडून दुर्गापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धुमाकूळ घातला.
इरपाचे यांच्यासोबत असलेले ते 3 पोलीस कर्मचारी कोण याबाबत लवकर खुलासा होणार आहे.
काही दिवसांपूर्वी शहरातील महाकाली यात्रेदरम्यान पत्रकाराला शहर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक गेडाम यांनी मारहाण केली होती, ते प्रकरण ताजे असताना पुन्हा एका पोलीस उपनिरीक्षकाने असा प्रकार केला ते सुद्धा हद्दीच्या बाहेर.
रितीज ने झालेल्या मारहाणीबाबत वडिलांना सविस्तर सांगितले, स्वतःवर विनाकारण झालेली मारहाण म्हणजे हा अन्याय आहे, असे मनात ठेवत रितीज ने इरपाचे विरोधात तक्रार देण्याचे ठरविले.
दुसऱ्या दिवशी रितीज ने पोलीस स्टेशन गाठले मात्र कुणीही त्याच काही ऐकायला तयार नव्हते, अखेरीस रितीज ने जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांचं दार ठोठावले, त्यानंतर रितीज ची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले, घटना घडल्याच्या 2 दिवसांनी रितीज ची वैधकीय चाचणी करण्यात आली हे विशेष.
रितीज ने इरपाचे यांच्याविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक व दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली मात्र अजूनही पोलिसांनी इरपाचे विरोधात गुन्हा दाखल केला नाही.
याबाबत सविस्तर माहिती साठी दुर्गापुर पोलीस निरीक्षक अनिल जित्तावार यांच्याशी संपर्क साधला असता तक्रार आमच्याकडे आली आहे, सध्या चौकशी सुरू आहे असे त्यांनी सांगितले.
18 एप्रिलला रितीज व त्यांच्या मित्रांचे बयान नोंदविण्यात आले आहे. अशी माहिती स्वतः रितीज ने News34 ला दिली आहे.
सदर प्रकरणाची दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक रोशन इरपाचे यांना वारंवार सम्पर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
पोलीस उपनिरीक्षक इरपाचे आपल्या सोबत 3 पोलीस कर्मचाऱ्यांना दुर्गापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत का गेले हा मोठा प्रश्न असून चौकशीत मध्ये ते समोर येईलचं.
मात्र कारवाई होणार की नाही याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांच्या मुलाला पोलिसाने अमानुष मारहाण केली मात्र अजूनही त्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली नाही, जर असे प्रकार पोलीसांच्या पाल्यासोबत होत असेल तर सामान्य नागरिकांना काय न्याय मिळणार?