News34 chandrapur
चंद्रपूर : पैनगंगा कोळसा खाण क्षेत्रात गोलछा ग्रुपच्या एएसडीसी कंपनीत कार्यरत शेकडो ट्रकांना उपप्रादेशिक परिवहन विभागाची कुठलीही परवानगी न घेता त्यांना कापून भंगारात विकले जात आहे. यातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल आणि फायनान्स कंपनीचे कर्ज बुडवले जात आहे.
हा धक्कादायक प्रकार शिवसेनाप्रणित कंत्राटी कामगार सेनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष कैलाश तेलतुंबडे यांनी समोर आणला असून, याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्याकडे तक्रार दाखल करन त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी केली आहेत, तर मा. मोरे यांनी देखील याची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
पैनगंगा कोळसा खाणी अंतर्गत राजस्थान येथील गोलछा ग्रुपची कंपनी एएसडीसी (असोसिएटेड सोपस्टोन डिस्ट्रिब्युटिंग कंपनी) कंपनीला कोळसा वाहून नेण्याचे कंत्राट मिळाले. तीन वर्षांसाठीचे हे कंत्राट होते. पैनगंगा कोळसा खाणीपासून घुगूस येथील नव्या रेल्वे सायडिंगपर्यंत हा कोळसा टिप्परच्या माध्यमातून पोचवायचा होता. दररोज 500 मेट्रिक टन इतका कोळसा पोचविण्याचे हे काम होते. यासाठी शेकडो ट्रक या कंपनीने फायनान्स कंपनीच्या मदतीने विकत घेतले. सहा वर्षांचे कंत्राट पूर्ण झाले आणि नवे कंत्राट मिळाले नाही. यातील बहुतांशी वाहनांचे कर्जच फेडण्यात आले नाही. आणि त्यामुळे या वाहनांची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. Finance company loan
हे सर्व फायनान्स कंपनी, आरटीओ विभागाच्या काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने होत आहे. कंपनीचा प्रकल्प अधिकारी करणसिंग गेहलोत हा याचा मुख्य सूत्रधार आहे. याबाबतची तक्रार जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कैलाश तेलतुंबडे यांना मिळाली. घटनास्थळी भेट दिली, यावेळी बिनधास्तपणे ट्रक वाहनांचे विघटन केले जात असल्याचे दिसून आले. हे भंगार म्हणून बाहेर विकले जात आहे. कारवाईची चाहूल लागताच प्रकल्प अधिकारी करणसिंग गेहलोत हा राजस्थानात पळून गेला. गोलछा ग्रुप हा अत्यंत प्रतिष्ठित ग्रुप असून देशातील अग्रणी स्थानावर आहे. Truck wreck
मात्र या ग्रुपच्या नावावर प्रकल्प अधिकारी गेहलोत सारखे भ्रष्ट व्यक्ती भ्रष्टाचार करीत आहेत. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांना तक्रार केली असता त्यांनी या रॅकेटची गंभीर दखल घेतली असून कारवाईची हमी दिली आहे. ही कारवाई झाल्यास एक मोठा घोटाळा उघडकीस येणार आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कंत्राटी कामगार सेना जिल्हा कार्याध्यक्ष कैलास तेलतुंबडे यांनी दिला आहे.