माझ्या आईला वडिलांनीचं मारले

मुलांसमोर वडिलांनी केला आईवर हल्ला

News34 chandrapur

चंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील अमराई वॉर्डातील आरती गणेश चापरे नामक विवाहित महिलेचा ८ मार्च रोजी संशयास्पद मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला आहे. मात्र, मृतक आरतीच्या बहिणीसह वडिलांनी तिने आत्महत्या केलेली नसून, हत्या करून आत्महत्येचा बनाव रचल्याचा आरोप मृतकाच्या पतीवर आणि त्याच्या कुटुंबीयांवर चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

आरती चापरे ही कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील मारोती यापलवार यांची मुलगी आहे. आरतीचा सहा वर्षांपूर्वी आर्णी येथील गणेश चापरे याच्यासोबत विवाह झाला होता. यादरम्यान, त्याना एक चार वर्षाचा मुलगा आणि एक दीड वर्षाचा अशी दोन मुले आहे. Crime updates

गणेश हा कोणताही कामधंदा करीत नव्हता. वेळोवेळी वेगवेगळे बहाणे सांगून आरतीला माहेरहून पैसे आणण्यासाठी त्रास देत होता, आरतीने याबाबत अनेक माहेरी सांगितल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. दरम्यान, ७ मार्च रोजी मध्यरात्री आरती हिचा नंदई दत्ता हुलगुंडे याने गंडचांदूर येथे फोन करून आरतीची प्रकृती गंभीर असून, तिला रुग्णालयात भरती केल्याचे सांगितले. दरम्यान, तातडीने आम्ही यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पोहोचलो असता ती अत्यवस्थ होती. यावेळी तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. उपचारादरम्यान, तिचा मृत्यू झाला.

यावर आरतीचा 4 वर्षीय मुलाने कुटुंबाला सांगितले की माझ्यासमोर बाबाने आईला मारले, मात्र त्या 4 वर्षीय बालकांचे साधं बयानही पोलिसांनी नोंदविले नाही.

परंतु, पोलिसांनी केवळ ३०४ ब आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. आरतीची हत्या झाल्याने तिच्या पतीवर तसेच त्याला सहकार्य करणाऱ्या त्याच्या बहिणीवर आणि बहीण जावयावर गुन्हे दाखल करून करण्यात यावी अशी मागणी मृतक आरतीची बहीण पूजा शंकर दांडेकर, आई इंदिरा यापलवार यांनी केली आहे.

याबाबत अवधुतवाडी चे पोलीस निरीक्षक मनोज केदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सदर प्रकरणाचा योग्य तपास सुरू आहे, जर मृतक महिलेचा मुलगा अशी काही माहिती देत असेल तर पीडित कुटुंबानी मला भेटायला हवं होतं, आता सुद्धा त्या मुलाचे म्हणणे ऐकून आम्ही पुन्हा योग्य रित्या तपास करू अशी माहिती केदार यांनी यावेळी दिली.