मूल शहरात 3 दिवस राबणार ही शोधमोहीम

बेघर नागरिकांचा आधार

News34 chandrapur (गुरू गुरनुले)

मूल – चंद्रपूर जिल्ह्यातील रोडवरील बेघर, बेवारस, भिक्षेकरी, निराधार, अनाथांसाठी एकमेव दिव्यवंदना आधार फाउंडेशन सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत आहे. Homeless citizens

दिव्यवंदना आधार फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक बेघर, बेवारस, भिक्षेकरी, निराधार, लोकांना आधार दिला आहे. फक्त आधारच नाही तर दिव्यवंदना आधार फाउंडेशन द्वारा लोकांच्या सेवेकरीता रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. शुभम पसारकर यांनी अनेक बेघर ,बेवारस लोकांना समाजाच्या प्रवाहात आणले आहे. त्यांनी चिमुर तालुक्यातील जामगाव येथे भव्य दिव्यवंदना आधार निवारागृहचे निर्माणकार्य सुरू केले आहे. आता ते मूल तालुक्यात तीन दिवसीय शोध मोहीम राबविणार आहे.
यामध्ये रोडवरील बेघर,बेवारस,निराधार,भिक्षेकरी अनाथ,यांना शोध घेऊन त्याची आंघोळ करून दाढ़ी कटिंग करण्यात येनार आहे व त्यास समाजात जगण्याचा अधिकार दीला जानार आहे. तुमच्या वापरण्यात न येनारे कपडे चपल आपण आम्हाला देऊ शकता. Divya Vandana Foundation

दिव्यवंदना फाउंडेशन चि संपूर्ण टीम व शहरातील नाग़रीक यावेळी उपस्थित राहनार आऊन तुमच्या परिसरातील अशे लोक भेट्लयास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क- 9561855778