चंद्रपूर पोलीस दलातील या कर्मचाऱ्याला 165 वेळा मिळाला सन्मान आणि आता…

पोलीस दलातील सर्वोत्तम कर्मचारी

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी अरुण हटवार यांची पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह वर्ष 2022 करीता निवड करण्यात आलेली आहे. Acb chandrapur

अरुण हटवार सध्या चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत आहे, दरवर्षी पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्याबद्दल सन्मानित करण्यात येते यंदा चंद्रपुरातील अरुण हटवार यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळणार असल्याचे जाहीर होताच चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांनी हटवार यांचा सन्मान केला. Lcb chandrapur

अरुण हटवार यांनी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा, ब्रह्मपुरी पोलीस ठाणे, लाचलुचपत चंद्रपूर मध्ये कर्तव्य बजावले आहे, त्यांनी मालमत्तेचे गुन्हे, घरफोडी सारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणले, पोलीस दलाबाबत त्यांचा कायम प्रामाणिक पणा राहिला आहे.

विविध पोलीस खात्यात त्यांच्या उत्कृष्ट कार्याने चंद्रपूर पोलीस दलाची प्रतिमा अनेकदा उंचावली आहे.
चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हटवार यांनी सापळा कारवाई मध्ये अग्रेसर सहभागी होत न्यायालयाचे पैरवी म्हणून काम बघितले आहे.

Chandrapur police
नागपूर घटकात सर्वात जास्त आरोपीना कोर्टातून शिक्षा ठोठावण्यात मोलाची कामगिरी सुद्धा हटवार यांनी केली आहे.
विशेष म्हणजे हटवार यांच्या आजपर्यंतच्या पोलीस दलातील कालावधीत 165 वेळा बक्षिसे मिळालेली आहे.
हटवार यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.