News34 chandrapur
चंद्रपूर – महिन्याच्या पहिल्या तारखेला केंद्र सरकारतर्फे नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करीत काही नियमावली मध्ये बदल केला जातो, तो बदल आपल्या दैनंदिन जीवनासाठी महत्वपूर्ण असतो. Maharashtra day
1 मे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिवशी सदर बदल लागू करण्यात आले आहे, आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 171.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
मुंबई व्यावसायिक गॅस सिलेंडर 1980 रुपयांऐवजी आता 1 हजार 808 रुपये 50 पैश्याना मिळेल. देशातील सर्वात मोठे मोबाईल नेटवर्क कम्पनी Jio, Airtel व Vodafone-idea यांनी नको असलेले कॉल (Spam Call) टाळण्यासाठी आपल्या सिस्टममध्ये फिल्टरचा वापर केला असल्याचा दावा करीत AI च्या माध्यमातून आता ग्राहकांना नको असलेल्या कॉल पासून कायमची मुक्तता मिळेल.
पेट्रोल आणि डिजल च्या दरात काहीही बदल करण्यात आला नाही, पंजाब नॅशनल बँकेने ATM व्यवहाराचे नियम बद्लविले असून आता एटीएममधून पैसे काढताना तुमच्या खात्यात शिल्लक रक्कम नसेल तर व्यवहार अयशस्वी होणार त्यामुळे ग्राहकांना 10 रुपयांचे शुल्काचा अधिभार लागणार.