News34 chandrapur
चंद्रपूर – नुकत्याच पार पडलेल्या बाजार समिती निवडणुकीत कांग्रेस ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचं भाजप जिल्हाध्यक्ष भोंगळे सोबत केलेलं नृत्य वादग्रस्त ठरलं, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकाश देवतळे यांना पदावरून कार्यमुक्त केलं.
मात्र ती कारवाई चुकीची आहे, मी कांग्रेस पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहो, मला कार्यमुक्त करण्याचा अधिकार नाना पटोले यांना नाही, मी गद्दार नाही, कांग्रेस पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहो, पण निदान माझी बाजू तरी ऐकुन घ्यायला हवी होती, अशी माहिती प्रकाश देवतळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात झालेल्या बाजार समिती निवडणुकीत अनेक ठिकाणी कांग्रेस व भाजप पक्षाने हातमिळवणी करीत पॅनल उभे केले होते, विशेष म्हणजे 2 बाजार समित्यांवर या अभद्र युतीचा विजय सुद्धा झाला, निकाल लागल्यावर चंद्रपूर बाजार समिती पुढे कांग्रेस अध्यक्ष देवतळे व भाजप अध्यक्ष भोंगळे यांनी विजयोत्सव साजरा केला होता, कांग्रेस पक्षाने स्थानिक निवडणुकीत भाजप व सत्तेत सहभागी असलेल्या पक्षासोबत आघाडी करू नये असे निर्देशित केले असताना सुद्धा चंद्रपूर बाजार समिती निवडणुकीत कांग्रेस व भाजपने हातमिळवणी केली.
विशेष म्हणजे कांग्रेस-भाजपच्या या अभद्र युतीने कांग्रेस खासदार बाळू धानोरकर गटाचा पराभव केला.
देवतळे यांना कार्यमुक्त केल्यावर आज पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले ही एकतर्फी कारवाई माझ्यावर करण्यात आली आहे, पक्षाला जर या निवडणुकीत काही गैर वाटले असेल तर त्यांनी आधी निरीक्षक नेमून चौकशी करीत मला कारणे दाखवा नोटीस द्यायला हवे होते, त्यानंतर मी शिस्तभंग समितीपुढे आपली बाजू मांडली असती, मात्र तसे काही न करता मला सरळ पदावरून कार्यमुक्त केले.
याबाबत मी कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यापुढे पक्षाचा अहवाल सादर करीत दाद मागणार आहे अशी माहिती देवतळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत देवतळे यांनी मूल, भद्रावती व राजुरा येथे कांग्रेसच्या पॅनल मध्ये भाजप पक्षाचे उमेदवार उभे केल्या गेले होते, मात्र त्यावर काही न बोलता सरळ माझ्यावर कारवाई करणे ही चुकीचे आहे.
वर्ष 2014 ला जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेतल्यावर अनेकांचा विरोध सहन करीत मी पक्ष संघटना बळकट केली, आज जिल्हयात खासदार, 3 आमदार व विधानपरिषदेचे आमदार निवडून आणण्यात मी अहोरात्र मेहनत घेतली, मी गद्दार नाही, त्यादिवशी केलेलं नृत्य हे अनावधानाने झालं होतं याचा अर्थ असा नाही की आमचं भाजप पक्षासोबत मैत्री असेल. Chandrapur congress party
पक्षाने निरीक्षक नेमत झालेल्या बाजार समिती निवडणुकीवर अहवाल तयार केल्यावर दूध का दूध पाणी का पाणी होईलचं.
देवतळे हे आजच्या पत्रकार परिषदेत बाकी तालुक्यात झालेली युतीबद्दल बोलत होते मात्र पत्रकारांच्या चंद्रपूर बाजार समितीवर केलेल्या युतीबद्दल विचारताच त्यावर त्यांनी बोलणे टाळले.