चित्रपट द केरळ स्टोरीचा नवा वाद

अभिनेत्री भडकली

News34 chandrapur

चंद्रपूर/मुंबई – बहुचर्चित चित्रपट द केरळ स्टोरी प्रदर्शनापूर्वी वादात सापडला होता, मात्र 5 मे ला चित्रपट प्रदर्शित होताच पुन्हा हा चित्रपट वादात सापडला आहे.

सुदीप्तो सेन दिग्दर्शित केरळ स्टोरी हा हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे, केरळ मधील तब्बल 32 हजार हिंदू व ख्रिश्चन तरुणी लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकल्या, त्यानंतर त्यांचं धर्मांतरण करण्यात आल्याची कहाणी केरळ स्टोरी मध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. The kerla story

मात्र 32 हजार मुलींच्या धर्मांतरणाचा दावा अनेकांनी फेटाळला, त्यानंतर यावर वाद सुरू झाला, त्यानंतर दिगदर्शकांनी 32 हजार तरुणीच्या धर्मांतरणाचा आकडा 3 हजारांवर आणला.

अनेकांनी ह्या चित्रपटावर बंदी आणण्याची याचिका न्यायालयात दाखल केली होती, त्यावेळी न्यायालयाने याचिका फेटाळून लावली, मात्र Youtube ने द केरळ स्टोरी चित्रपटाच्या ट्रेलरवर कारवाई केली आहे, यावर एका युजरने ट्वीट केले की ‘द केरला स्टोरी’चा ट्रेलर सर्च केल्यावर यूट्यूबवरून एक इशाराचिन्ह दिसतो. ज्यावर लिहिले आहे की हा कंटेंट आत्महत्या आणि आत्महानीशी संबंधित आहे.

Youtube च्या या कारवाई नंतर अभिनेत्री अडा शर्मा चांगलीच भडकली आहे, अदाने ‘सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईल’, असे कॅप्शन देत री-ट्वीट केले आहे.