तर संस्थाचालकाच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणार – अशोक तुमराम

न्यायासाठी लढा

News34chandrapur

चंद्रपूर /मूल – तालुक्यातील शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित नवभारत कन्या विद्यालयात शिपाई या पदावर कार्यरत मुनीम सिडाम यांचे वर्ष 2017 मध्ये आकस्मिक निधन झाले होते. Job
त्यांनतर सिडाम यांचा मुलगा आकाश ला वडिलांच्या जागी अनुकंपा नियमानुसार सेवेत सामावून घ्यावे यासाठी सिडाम कुटुंबाने प्रयत्न सुरू केले. compassion
मात्र त्यांच्या हाती निराशाचं आली, शाळा व्यवस्थापनाने त्यांचं काही एक ऐकलं नाही, अखेर सिडाम कुटुंबातील आई, मुलगा व मुलीने शाळेच्या प्रांगणात 1 मे महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषण सुरू केले.
नवभारत कन्या विद्यालयात 23 वर्षे मुनीम सिडाम यांनी नोकरी केली, अजून 16 वर्षांची त्यांची सेवा उर्वरित असताना त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या जागी मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, शाळा व्यवस्थापनाने मुलाला नोकरी देऊ असे फक्त आश्वासन दिले.
मागील 6 वर्षांपासून आपल्या मुलाला नोकरी मिळावी यासाठी हर्षकला मुनीम सिडाम हे प्रयत्न करीत आहे मात्र अजूनही त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
आपल्या मुलाला न्याय मिळावा यासाठी हर्षकला सिडाम यांनी आकाश व मुलीला सोबत घेत नवभारत विद्यालयाच्या प्रांगणात 1 मे महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात केली, आंदोलनाचे 6 दिवस झाले मात्र शाळा व्यवस्थापनाने त्यांची दखल सुद्धा घेतली नाही.
चंद्रपूर जिल्ह्यातील आदीजन चेतना जागर या संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक तुमराम यांनी सिडाम यांच्या आंदोलन मंडपाला भेट देत त्यांना न्याय देऊ असे आश्वस्त केले.
याकरिता अशोक तुमराम यांनी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वासाडे यांची भेट घेत सिडाम यांच्या मागणीवर विचार करण्याची विनंती दिली त्यांनी 2 दिवसांचा वेळ मागितला आहे, विशेष म्हणजे प्रशासनाच्या वतीने अजूनही आंदोलनाची साधी दखल घेण्यात आली नाही.
आदीजन चेतना जागर संघटनेचे अध्यक्ष अशोक तुमराम यांनी सांगितले की आम्ही संस्था अध्यक्ष वासाडे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची वाट बघू जर त्यांनी मागणीची दखल घेतली नाही तर मंगळवार पासून आम्ही सर्व आदिवासी बांधव संस्था अध्यक्ष यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा दिला.