त्या घटनेत 21 पर्यटकांनी गमावला जीव

केरळ राज्यातील दुर्दैवी घटना

News34 chandrapur

केरळ – 40 पर्यटकांनी भरलेली हाऊस बोट उलटल्याने 21 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

स्थानिक पोलीस व NDRF ची चमू घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले आहे, मात्र या अपघातात 21 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, सायंकाळच्या सुमारास निघालेल्या डबल डेकर हाऊस बोट मध्ये तब्बल 40 प्रवासी होते, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोट मध्ये असल्याने ही घटना घडली.

केरळमधील या घटनेवर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.