चंद्रपुरात मनसे-वेकोली वाद पेटणार

वाद पेटणार

News34 chandrapur

चंद्रपूर – Corporate Social Responsibility म्हणजे व्यावसायिक सामाजिक जबाबदारी कंपन्यांमध्ये निसर्गातील साधन संपत्तीचा वापर करून नफा मिळवला जातो. त्याबदल्यात परतफेड करण्याची जबाबदारी असावी म्हणून CSR निधीची तरतूद करण्यात आली. खाजगी क्षेत्रातील कंपन्या नफ्याचा काही भाग बाजूला काढून ठेवतात. एक सामाजिक जबाबदारी म्हणून ह्या निधीतून समाजोपयोगी कार्य करण्यात येते. कंपनी कायदा २०१३ मध्ये यासंबंधी तरतुद आहे आणि प्रत्येक खाजगी कंपनीला CSR निधी जमा करणे बंधनकारक आहे.

या निधीचा चंद्रपुरात बेकायदेशीर रित्या वापर करण्यात आला असा आरोप चांद्रपुत मनसे विधी विभागाच्या जिल्हाध्यक्ष ऍड मंजू लेडांगे यांनी लावला आहे.

शहरातील खाजगी चांदा पब्लिक शाळेला 30 संगणक संच व 2 प्रिंटर वेकोलीच्या CSR निधी अंतर्गत दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

संगणक वाटप कार्यक्रमात खासदार बाळू धानोरकर व वेकोली चंद्रपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक संजय वैरागडे उपस्थित होते, मात्र तो CSR Fund कोणत्या नियमाने दिला यावर मनसेच्या विधी विभागाच्या ऍड. मंजू लेडांगे यांनी याबाबत मुख्य महाप्रबंधक वैरागडे यांना सवाल केला.

वैरागडे यांनी 4 दिवसात कोणत्या नियमात त्या निधीचा वापर करण्यात आला याबाबत उत्तर देतो असे सांगितले मात्र आठवडा गेल्यानंतरही उत्तर न दिल्याने लेडांगे या आता वेकोली विरोधात आंदोलन करणार आहे.

13 मे रोजी वेकोली मुख्य महाप्रबंधक कार्यालय चंद्रपूर येथे मनसे तर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, आंदोलनांनंतर वेकोली तर्फे उत्तर आले नाही तर याबाबत न्यायालयीन लढाई सुद्धा लढू अशी माहिती लेडांगे यांनी दिली आहे.