महिला पैलवानांच्या समर्थनार्थ चंद्रपूर जिल्हा महिला कांग्रेसने केला आवाज बुलंद

चंद्रपूर महिला कांग्रेस व जिल्हा NSUI चे पैलवानांच्या धरणे आंदोलनाला समर्थन

News34 chandrapur

चंद्रपूर: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी केलेल्या लैंगिक छळाच्या विरोधात भारतीय महिला कुस्तीगीर मागच्या १५ दिवसांपासून जंतर मंतर वर आंदोलन करत आहेत. सिंह यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली तरी अजून अटक मात्र झालेली नाही. केंद्रातील भाजप सरकार सिंह यांचा बचाव करत आहे म्हणून च भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी तसेच महिला कुस्तीगीरांना पाठींबा देण्यासाठी अखिल भारतीय महिला काँग्रेस च्या अध्यक्ष नेत्ता डीसुजा त्याच सोबत प्रदेश अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या सुचनेनुसार चंद्रपूर महिला काँग्रेस (ग्रामीण) च्या वतीने जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृत्वात दिनांक ९ मे रोजी कँडल मार्च चे आयोजन जटपुरा गेट येथे करण्यात आले होते.

 

यावेळी महिलांनी मेणबत्ती पेटवून कुस्ती पटूंना न्याय देण्याची मागणी करून त्यांच्या आंदोलनाला समर्थन दिले. जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांना तत्काळ अटक करण्यात यावी तसेच त्यांना त्यांच्या पदावरून हटवावे अशी मागणी केली तसेच भारतीय महिला कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी सर्व महिलांनी समोर यावे असे आवाहन केले. Woman wrestler protest jantar mantar

 

या आंदोलनाला चंद्रपूर महिला काँग्रेस च्या विधानसभा अध्यक्ष सुनीता धोटे, तालुका अध्यक्ष शितल कातकर, जिल्हा उपाध्यक्ष लता बारापात्रे, जिल्हा महासचिव मेहेक सय्यद,जिल्हा महासचिव शोभा वाघमारे, जिल्हा महासचिव संगीता मित्तल, जिल्हा महासचिव मीनाक्षी गुजरकर, जिल्हा सचिव सीमा धुर्वे, जिल्हा सचिव वैशाली जोशी, जिल्हा सचिव रिता रॉय, सचिव माला चक्रवर्ती, जिल्हा सचिव माला माणिकपुरी, सचिव किरण वानखेडे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे, कल्पना चक्रवर्ती, वर्षा अंबिलवार, नंदा राजूरकर, माधुरी पिसे, ममता मसराम, मीनाक्षी चौधरी, ओवी खणके, आरती खणके, हर्षाली कामडे, संगीता बानकर, सविता करंडे, वैशाखी दाली, अनिता भिसे, अश्विनी जुमडे, पौर्णिमा माडे, ममता क्षिरसागर, उषा कामतवार, गिरीजा मांढरे, माधव अवथरे, प्रतीक दुर्योधन, प्रदीप गुरनुले, कैलाश दुर्योधन, नरेंद्र डोंगरे, विराज नारायणे, विनीत डोंगरे, प्रकाश दासरवार, सारंग चालखुरे यांच्या सह महिला काँग्रेस च्या बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होत्या.

चंद्रपूर NSUI चे स्वाक्षरी अभियान

देशासाठी खेळणाऱ्या कुस्तीपटूंना नयन मागण्यासाठी आज धरणे आंदोलन करावे लागत आहे, राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषण व विनायभंगाचे आरोप केले आहे, ब्रिजभूषण सिंह यांच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला मात्र अजूनही अटक केली नाही.

कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ चंद्रपूर NSUI ने स्वाक्षरी अभियान चंद्रपुरातील विविध महाविद्यालयात 9 मे ला राबविले.

Nsui चे राष्ट्रीय सचिव रोशन लाल बिट्टू यांच्या मार्गदर्शनाखाली nsui चे जिल्हाध्यक्ष शफाक शेख यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी सहित Nsui चे याकूब पठाण, हिमांशू आवले, प्रतीक नल्लाला, उमेश बरडे, प्रणित तोडे, योगेश, संजू ग्वालवंशी व असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.