News34 chandrapur
चंद्रपूर – 30 एप्रिलला चंद्रपूर शहरातील भिवापूर येथील चिकन मार्केट मध्ये लालपेठ कॉलरी येथील 70 वर्षीय रायलिंगु इरय्या परसा हे चिकन घेण्यासाठी गेले होते, त्यावेळी त्यांनी दुचाकी होंडा ऍक्टिव्हा क्रमांक MH34AN4166 विदर्भ चिकन सेंटरसमोर लावून गेले, चिकन घेतल्यावर जेव्हा रायलिंगु परत आले त्यावेळी त्यांना दुचाकी त्याठिकाणी आढळली नाही.
रायलिंगु यांनी याबाबत 2 मे ला चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी चोरीची फिर्याद नोंदविली, पोलिसांनी 379 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.
गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली असता लालपेठ येथे एक युवक चोरी गेलेले वाहन घेऊन फिरत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी त्या युवकाचा पाठलाग करीत त्याला ताब्यात घेतले. Chandrapur city police
आरोपी 23 वर्षीय साहिल भीमा सुरमिलवार रा. माता नगर चौक याला पोलिसांनी अटक करीत त्याच्या जवळील चोरी गेलेले होंडा ऍक्टिव्हा वाहन जप्त करीत एकूण 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर वाहन चोरीचा पुढील तपास पोलीस कर्मचारी विलास निकोडे करीत आहे.
सदरची यशस्वी कारवाई उपविभागीय पोलीस अधीकारी सुधीर नंदनवार, पुलिस निरीक्षक सतीश सिंह राजपूत, प्रभारी अधिकारी सपोनी रमीज मुलानी, पोलीस ठाणे चंद्रपुर शहर यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक प्रमुख सहाय्यक पुलिस निरीक्षक मंगेश भोंगाडे, शरीफ शेख, महेंद्र बेसरकर, विलास निकोडे, जयंत चुनारकर, नापोशि सचिन बोरकर, चेतन गज्जलवार, प्रमोद डोंगरे , रूपेश रणदिवे, इम्रान खॉन, इरशाद शेख, दिलीप कुसराम, खुशाल कावडे यांनी केली.