News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपुरातील खाजगी शाळेला वेकोलीच्या csr निधीतून 30 संगणक व 2 प्रिंटर दिल्याने मनसे ने याविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे, वेकोली विरोधात मनसे विधी विभागातर्फे 13 मे ला चंद्रपूर वेकोली मुख्य महाप्रबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. CSR FUND WCL
शहरातील खाजगी शाळा चांदा पब्लिक स्कुल ला खासदार बाळू धानोरकर यांच्या शिफारशींवर शाळेला 30 संगणक व 2 प्रिंटर स्वतः वेकोली मुख्य महाप्रबंधक संजय वैरागडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले होते, यावर मनसे विधी विभागाच्या जिल्हाध्यक्ष ऍड. मंजू लेडांगे यांनी आक्षेप घेत कोणत्या नियमानुसार खाजगी शाळेला csr निधीतून साहित्य देण्यात आले याबाबत वेकोली मुख्य महाप्रबंधक वैरागडे यांना जाब विचारला होता.
पुढील 2 ते 3 दिवसात याबाबत सविस्तर उत्तर देऊ असे आश्वासन वैरागडे यांनी दिले, मात्र आठवडा लोटून सुद्धा याबाबत काही समाधानकारक उत्तर दिले नसल्याने लेडांगे यांनी 13 मे ला वेकोली मुख्य महाप्रबंधक यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
Csr निधीच्या नियमात शिक्षण व गरजू साठी ही निधी वापरण्यात येते, मात्र चांदा पब्लिक स्कुल सारख्या संपन्न शाळेला 30 संगणक व प्रिंटर हे कसल्या नियमात देण्यात आले? त्यांना निधी दिल्यावर कुणाचा फायदा झाला याबाबत वेकोलीने काही एक समाधानकारक उत्तर दिले नाही.
उलट यावर उडवाउडवीची उत्तरे दिली, आंदोलनाच्या एक दिवस आधी वेकोलीने लेडांगे यांना ते संगणक खासदार बाळू धानोरकर यांच्या शिफारशींवर देण्यात आल्याचे म्हटले व सोबत त्या शाळेत 200 मुलांना निःशुल्क शिक्षण देण्यात येते याकरिता ते साहित्य त्यांना देण्यात आले असा त्या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
वेकोलीचे हे पत्र साशंकता निर्माण करणारे आहे, धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही वेकोलीला इशारा दिला आहे आमचं पुढचं पाऊल आता कायदेशीर लढाई असणार अशी प्रतिक्रिया मंजू लेडांगे यांनी दिली आहे.
आयोजित धरणे आंदोलनात मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, माजी जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनोज तांबेकर व असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.