News34 chandrapur
चंद्रपूर – ह्दयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासारखी दोन शब्द म्हणजे ती आई. एका आईने जन्म दिला. तर दुस-या आईने पालन पोषण केले. शिक्षित केले. या दोन आईच्या प्रेमात, त्यांच्या शिस्तीत आणि संस्कारात रोवल्या गेललं रोपट आता कल्पवृक्ष बनुन अनेकांना आधाररुपी सावली देत आहे. Mother’s day 2023
होय, ही गोष्ट आहे. चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची. आमदार किशोर जोरगेवार हे अत्यंत साध्या कुटंबात जन्मले. गजाणण जोरगेवार यांच्या पहिल्या पत्नी प्रभा यांना मुलबाळ नव्हती. म्हणुन त्यांनी गंगुबाई म्हणजेच अम्मा यांच्याशी लग्न केल. आणि अम्माने किशोर जोरगेवार यांना जन्म दिला. मात्र यावेळी जोरगेवार कुटुंबीयांची परिस्थिती अतिशय खराब होती. गरिबीची चटचे सोसत किशोर हे लहाण्याचे मोठे झाले. मात्र अशा काळात अम्मा यांनी परिवारासाठी कष्ट करणे सुरु केले. त्यांनी टोपल्याचा व्यवसायातून परिवाराचा सांभाळ सुरु केला. तर प्रभा यांनी मुलांच्या पालण पोषणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. अम्मा व्यवसायात व्यस्त झाल्यात. तर प्रभा आपला पूर्ण वेळ मुलांच्या शिक्षणाकडे देऊ लागल्या. हळुहळु हा प्रपंच चालु लागला.
एका आईचे प्रेम, तर दुस-या आईने दिलेल्या कष्ट आणि प्रामाणिकता या मुलमंत्रावर किशोर जोरगेवार चालु लागले. कष्ट करण्याची जिद्द यातुन त्यांच्यात आली. तर दुस-यांप्रती प्रेमभावनाही त्यांच्यात निर्माण झाली होती. मातृत्वाच्या शक्तीतून समाजिकभान असलेला सामाजिक कार्यकर्ता चंद्रपूर जिल्ह्यात तयार झाला होता. तो म्हणजे आजचे आमदार किशोर जोरगेवार.
आईच्या शिकवणीवर ते खरे उतरले आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी त्यांचा लढा सुरु आहे. गरिब गरजू मुलांना उत्तम अभ्यास करता यावा या करिता मतदार संघात 11 अभ्यासिका ते तयार करित आहे. तर कोणीही उपाश्या पोटी निजी जावू नये म्हणून अम्मा चा टिफिन हा उपक्रम त्यांनी सुरु केला आहे. नागरिकांना उत्तम आरोग्य मिळावे म्हणून विविध ठिकाणी आरोग्य शिबर ते आयोजित करत आहेत. तर महिलांना स्वयंरोजगारातुन आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांच्या वतीने निशुल्क शिवणकामाचे प्रशिक्षण दिल्या जात आहे. खरस जागात आई ही अशी एक देवता आहे. तिच्याबद्दल कोणीही नास्तिक नाही. हे मात्र खरे ..