News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल – खेडी ते गोंडपिपरी मार्गाचे बांधकाम मागील चार वर्षापासून सुरू आहे. सदर रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट होत असून यामध्ये प्रचंड प्रमाणात ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने भ्रष्टाचार झालेला आहे. नियोजन शून्य व मनमर्जीने काम होत असल्यामुळे रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. Corruption in road work
या परिसरातील जनता व प्रवासी दररोज या रस्त्याच्या संकटाचा सामना करत असून या रस्त्यामध्ये कित्येक नागरिकांचे अपघात होऊन जीवही गेलेले आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे खोदून ठेवलेले आहेत त्यामुळे प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.
या रस्त्याच्या संदर्भात विविध राजकीय पक्षांनी व संघटनांनी निवेदने, आंदोलने करूनही ठेकेदार दादागिरी करून लोकांच्या जीवांची व शेतकऱ्यांच्या रस्त्यालगत पिकांची पर्वा न करता स्वमर्जीनेच काम करत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तरी सुद्धा रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झाले नाही. करीता संबंधित बांधकाम विभागाच्या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने दिनांक १६ मे २०२३ रोजी त्याच मार्गावर दोन ठिकाणी परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात करण्यात येईल असे युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन नीलमवार यांनी लेखी निवेदनाद्वारे संबंधित विभागाला कळविले आहे. Congress movement
यासाठी जन आंदोलन उभारण्याची अत्यंत गरज आहे. सदर रस्त्याच्या विषयाला घेऊन काँग्रेस, युवक काँग्रेसचे दिनांक १६/०५/२०२३ रोज मंगळवारला सकाळी ९.०० वाजता तीव्र आंदोलन करण्याचे ठरवलेले आहे. या आंदोलनात परिसरातील सर्व जनतेनी सहभागी व्हावे असे आवाहन व विनंती युवक काँग्रेसने केली आहे. सदर रस्त्याच्या नियोजन शून्य व निकृष्ट बांधकामाविरोधात ठेकेदार व अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी व होणारा रस्ता त्वरित पूर्ण सुरळीत करण्यासाठी मोठ्या संख्येने सदर आंदोलनात उपस्थित राहण्याचे करावे. असेही आव्हान केले आहे.