कांग्रेसचे ते आंदोलन लेखी आश्वासनामुळे रद्द

रस्ता रोको आंदोलन

News34 chandrapur गुरू गुरनुले

मुल – खेडी ते गोंडपिपरी मार्गाचे बांधकाम मागील चार वर्षापासून सुरू आहे. सदर रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट होत असून यामध्ये प्रचंड प्रमाणात ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने भ्रष्टाचार झालेला आहे. Congress party

नियोजन शून्य व मनमर्जीने काम होत असल्यामुळे रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. या परिसरातील जनता व प्रवासी दररोज या रस्त्याच्या संकटाचा सामना करत असून या रस्त्यामध्ये कित्येक नागरिकांचे अपघात होऊन जीवही गेलेले आहेत. Poor road conditions

रस्त्यावर मोठमोठे खड्डे खोदून ठेवलेले आहेत त्यामुळे प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या रस्त्याच्या संदर्भात विविध राजकीय पक्षांनी व संघटनांनी निवेदने, आंदोलने करूनही ठेकेदार दादागिरी करून लोकांच्या जीवांची व शेतकऱ्यांच्या रस्त्यालगत पिकांची पर्वा न करता स्वमर्जीनेच काम करत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तरी सुद्धा रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झाले नाही.करीता संबंधित बांधकाम विभागाच्या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने दिनांक १६ मे २०२३ रोजी सकाळी ९ वाजेपासून चांदापुर चौक व नांदगाव दिघोरी फाट्यावर खेडी गोंडपिप्री मार्गावरील अनेक गावातील नागरिकांच्या सोबत घेऊन युवक काँग्रेसच्या वतीने व राष्ट्रीय काँग्रेसच्या सहकार्याने रास्तारोको आंदोलन सुरु करण्यात आले.

असंख्य नागरिक व काँग्रेस पदाधिकारी रस्त्यावर बसून आंदोलन केले. आंदोलनाला उत्तम प्रतिसाद असल्याने पोलिस प्रशासनातर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे ,पोलिस निरीक्षक सुमित परतेकी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन गोंडपीपरी बांधकाम उपविभागाचे उपअभियंता व बांधकाम करणारे ठेकेदार यांना तात्काळ बोलाऊन त्यांचेकडून काम त्वरित करुन देण्याची लेखी मागणी रेटून धरली.

उपअभियंता श्री. रा.व.चव्हाण आणि ठेकेदार श्री.कार्तिक यांनी आंदोलनकर्त्यां समोर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे पत्र क्रमांक जावक क्र.२६१/ता.२३/दिनांक १६/५/३०२३ या पत्रांन्वये माहे जून २०२३ पर्यंत पूर्ण काम करुन देण्यात येईल. खेडी गोंडपीपरी मार्गात मृत्यू झालेल्या,जखमी झालेल्या, व्यक्ती,जनावरे, याची भरपाई तात्काळ भरुन देण्यात येईल. दि.२७ मे पासून लगेच काम सुरु करण्यात येईल, या कालावधीत काही अपघात झाल्यास त्याचीही सर्वस्वी जबाबदारी आमचे वर राहील.

तसेच दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास पोलिसांच्या कारवाईस आम्ही पात्र राहू अशा स्वरूपाचे लेखी लिहून देऊन उपस्थित असंख्य आंदोलन कर्त्यांसमोर वाचून दाखविले तेव्हाच आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात काँग्रेस नेते कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, माजी सभापती व संचालक घनश्याम येनुरकर, राजू पाटील मारकवार, संचालक सुमित आरेकर,तालुका काँग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष शंतनु धोटे, ज्येष्ठ काँग्रेस नेते दीपक पा. वाढई, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन निलमवार, माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, सोसायटी अध्यक्ष गणेश खोब्रागडे, सुबोध बुग्गावार, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, संयोजक प्रशांत उरांडे, नांदगाव सरपंच हिमानी वाकुडकर,उपसरपंच सागर देऊरकर, संचालक जालिंदर बंगरे, बेंबाळ सरपंच चांगदेव केमेकर,उपसरपंच ध्यांनबोइंवार, बाबराळा सरपंच धीरज गोहणे,योगेश शेरकी,नरेश कोरडे,त्रिमूर्ती नाहगमकर, उमाकांत मडावी,दीपक कोटगले,सुहास वाढई,समीर काळे, संदीप मोहबे,रणजित आकुलवार, यांचेसह, राजगड, चांदापुर,भवराला, गडीसूर्ला,नवेगाव भुजला, बेंबाळ, बोंडाला, नांदगाव,घोसरी, परिसरातील असंख्य ग्रामस्थ,महिला, ग्राम पंचायत उपसरपंच ,सदस्य, काँग्रेस कार्यकर्ते मोठ्यासंखेने उपस्थित होते. उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनात पोलिस बंदोबस्त भरपूर ठेवण्यात आला. अतिशय शांततेच्या मार्गाने कायद्याचे पालन करुन आंदोलन करण्यात आले होते.