Oyo हॉटेल्स रूम बाबतच्या या अटी माहिती आहे काय?

Oyo ची नियमावली

News34 chandrapur

चंद्रपूर – वर्ष 2012 मध्ये रितेश अग्रवाल यांनी Oravel Stays नामक कंपनीची स्थापना केली, त्यानंतर वर्ष 2013 मध्ये कंपनीचे नाव बदलून त्यांनी oyo नाव ठेवले.
आज oyo च्या व्यवसाय संपूर्ण जगात पसरला आहे.
Oyo हॉटेल्स ही भाड्याने रूम देणारी एक साखळी आहे, oyo चा अर्थ on your owen rooms असा होतो.
काही तासासाठी किंवा दिवसांसाठी हॉटेलमधील रूम हवी असल्यास आपल्याला शहरानुसार त्या दरात रूम भाड्याने मिळते.

Oyo मधील रूम्स खास प्रेमी जोडप्यांसाठी बनल्या आहे, आज प्रेमी जोडपे एकांतात बसू शकत नाही त्यांना हे जणू वरदान आहे.

Oyo बुक करण्यासाठी काय करावे?

रूम बुक करण्यासाठी आपले वय किमान 18 वर्षे पूर्ण हवे.
हॉटेलमध्ये थांबण्यासाठी आपल्याजवळ valid id proof असायला हवे.
ओळखपत्र हे original असावे, साक्षांकित प्रत चालणार नाही.
18 वर्षे वयोगटाखाली मुलांना रूम उपलब्ध होणार नाही.

आज oyo चा व्यापार चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे, oyo हे प्रेमी युगलांसाठी जणू वरदान आहे, मात्र आजकाल दुसऱ्याच्या नावाचे ओळखपत्र देत रूम दिल्या जात आहे.

प्रेमी जोडप्यासाठीं पर्वणी

असे अनेक प्रकार चंद्रपुरात सुरू आहे, अनेक गल्ली बोळात oyo सुरू झाले, काही रस्त्याच्या कडेला काही जंगलाच्या दिशेने, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर वन्यप्राण्यांचा वावर आणि जायला साधा रस्ता नाही अश्या ठिकाणी oyo ची धूम सुरू आहे, बायपास मार्गावरील फिरायला येणाऱ्या जोडप्यांसाठी तर oyo हॉटेल एक पर्वणी चं बनले आहे.

शहरातील काही oyo पोलिसांच्या रडारवर आहे कारण काही ठिकाणी अल्पवयीन जोडप्यांना oyo मध्ये जाण्याची परवानगी दिली जात आहे, हे प्रकार थांबायला हवे अन्यथा भविष्यात मोठी घटना कुणीही नाकारू शकत नाही.