चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय इतिहासाला काळिमा – विजय वडेट्टीवार

नवनिर्वाचित बाजार समिती सभापती व संचालकांचा सत्कार

News34 chandrapur  गुरू गुरनुले

 

चंद्रपूर : तत्कालीन पदाधिका-यांच्या कारभाराने मधल्या काळात डबघाईस आलेली चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आता शेतकऱ्यांच्या दुःखात सुख आणि गरजुंच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे काम करीत आहे. असे असताना काही मंडळी बँकेच्या कारभारात आडकाठी आणण्याचे काम करीत आहे. असे मत माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

बाजार समिती सभापती, संचालकांचा सत्कार

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने स्थानिक मा.सां. कन्नमवार सभागृहात आयोजित सहकार मेळावा आणि सत्कार सोहळ्यात विजय वडेट्टीवार बोलत होते.
माजी मंञी विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मेळाव्यात राजुरा क्षेञाचे आ. सुभाष धोटे, विधान परीषद सदस्य आ. अँड.अभिजीत वंजारी, आ. सुधाकर अडबाले, ज्येष्ठ विधीज्ञ अँड. पुरूषोत्तम सातपुते, अँड. अजीत लाभे, बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, उपाध्यक्ष यशवंत दिघोरे,’बँकेचे माजी अध्यक्ष सुभाषसिंह गौर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, प्रकाश देवतळे आदी मान्यवर उपस्थित होते.

छञपती शिवाजी महाराज, राजश्री शाहु महाराज, महात्मा फुले, डाँ.बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन आणि दिप प्रज्वलनाने मेळाव्याचा श्रीगणेशा झाला. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी प्रास्ताविकामधुन बँकेचा लेखाजोगा आणि प्रगतीचा आलेख सादर केला. यावेळी आ. अँड. अभिजीत वंजारी यांनी सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळीनी सेवाभाव डोळ्यासमोर ठेवुन कार्ये करण्याचे आवाहन केले.

ज्येष्ठ विधीज्ञ अँड. पुरूषोत्तम सातपुते यांनी जिल्ह्यातील सर्व बाजार समितीनी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने योजना राबवाव्या अशी अपेक्षा व्यक्त केली. आ. सुधाकर अडबाले यांनी शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवतांना सामान्य जनतेसाठीही कार्यरत राहील. अशी ग्वाही दिली तर सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या मंडळीनी विकासासाठी विरोध न करता विकासासाठी एकजुटीने काम करण्याची विनंती केली.

नवनिर्वाचित बाजार समिती सभापती व संचालकांचा सत्कार

संपन्न झालेल्या कार्यक्रमात विधान परीषद सदस्य आ. सुधाकर अडबाले यांचा बँकेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देवुन अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि उपस्थित संचालकवृंदानी सत्कार केला. सहकार मेळाव्याचे औचित्य साधुन जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती डाँ. विजय देवतळे, मंगेश धाडसे, भाष्कर ताजणे, प्रभाकर सेलोकर, राकेश रत्नावार, रमाकांत लोधे, विकास देवाळकर, अशोक बावने, गंगाधर वैद्य आणि उपसभापती राजेंद्र कन्नमवार, जयंत टेभुर्डे, आश्लेषा जिवतोडे, सुनिता तिडके, दादाजी चौखे, संजय पावडे, वंदना बल्की, आशिष कावटवार आदींचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देवुन बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

माजी मंञी विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाने मेळाव्याची सांगता झाली. कार्यक्रमाचे संचलन संजय पडोळे यांनी तर उपस्थितांचे आभार बँकेचे संचालक रविंद्र शिंदे यांनी मानले. मेळाव्याला बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, डाँ. विजय देवतळे, चंद्रकांत गोहोकार, अनिल वाढई, दामोधर रूयारकर, विजय बावने, प्रभा वासाडे, नंदा अल्लुरवार, सुचिञा ठाकरे, प्रकाश बंसोड, डाँ. ललित मोटघरे, राजेश रघाताटे, उल्हास करपे, दामोधर मिसार, संजय तोटावार, महीला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर, माजी अध्यक्ष चिञा डांगे, सुनिता लोढीया यांचेसह बाजार समितीचे संचालकवृंद, तालुक्यातील सहकारी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, गटसचिव, बँकेचे ग्राहक आणि कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासाला काळिमा

बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचेवर झालेला गोळीबार जिल्ह्याच्या इतिहासाला काळीमा लावणारा असुन हल्लेखोरांचा शोध लागलाच पाहीजे अशी मागणी आ. विजय वडेट्टीवार, आ. सुभाष धोटे आणि आ. सुधाकर अडबाले यांनी मनोगतामधुन व्यक्त केली.