2 हजार रुपयांच्या नोट बदलायच्या आहेत? पण हे नियम ठाऊक आहे का?

नागरिकांनो बँकेत गर्दी करू नका

News34 chandrapur

चंद्रपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2016 ला देशातील 500 व 1000 च्या नोटा चलनातून बाद करीत नोटबंदी जाहीर केली होती, मात्र अचानक झालेल्या या निर्णयामुळे अनेकांचे जीव गेले होते, त्यांनतर वर्ष 2023 मध्ये पुन्हा नोटबंदी ची घोषणा करण्यात आली आहे, 2000 रुपयांच्या नोटा आता चलनात राहणार नाही अशी घोषणा RBI ने 19 मे ला केली, आता 2 हजार रुपयांच्या नोटा 23 मे पासून बँकेत बदलता येणार आहे.

नोटा बदलायच्या वेळी ग्राहकांनी गर्दी करू नये कारण सध्या 4 महिन्याचा कालावधी नागरिकांना देण्यात आला आहे. demonetisation

किती नोटा एकावेळी बदलविता येणार?

RBI ने 30 सप्टेंबर पर्यंत नागरिकांना बँकेतून नोटा बदलविणे व बँक खात्यात जमा करण्यासाठी 4 महिन्याचा वेळ दिला आहे, नागरिकांना एकावेळी फक्त 10 नोटा म्हणजेच 20 हजार रुपयांपर्यंत बदलविता येणार आहे, मात्र बँक खात्यात आपण कितीही नोटा बदलवू शकतात.

आपले बँकेत खाते नसले तरीही आपल्याला नोटा बदलवून भेटणार आहे.

स्टेट बँकेने नोट बद्लविण्यासाठी कसलाही फॉर्म भरावा लागणार नाही असे जाहीर केले आहे.

नोट बदलविण्यासाठी काही शुल्क लागेल काय?

नोट बदलविणे ही मोफत सेवा असून आपल्याला बँकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे मागितले तर वरिष्ठांकडे नागरिक आपली तक्रार नोंदवू शकता.

बँकेला करावी लागणार ही सुविधा

सध्या देशात उन्हाचा तडाखा वाढत असल्याने नागरिकांना नोटा बदलविते वेळी कसलाही त्रास होऊ नये यासाठी पाणी व सावलीची व्यवस्था बँकेला करावी लागणार अश्या मार्गदर्शक सूचना RBI ने जारी केल्या आहे.

एकापेक्षा 5 नोटा असतील तर होणार कारवाई

एखाद्या व्यक्तीकडे 2 हजार रुपयांच्या नोटा बनावट असतील तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी लागेल, बनावट नोट सोरटींग मशीन द्वारे सॉर्ट केल्या जातील.

जर 5 पेक्षा जास्त बनावट नोटा कुणाकडे आढळल्यास त्यांच्यावर पोलीस कारवाई केल्या जाणार आहे.