मनसेच्या हिसक्याने वेकोलीची माघार

मनसेचा हिसका

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा वन संपत्ती सह कोळसा खाणीने वेढलेला जिल्हा आहे, जिल्ह्यात नैसर्गिक सौंदर्य असले तरी कोळसा खाणीमुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे सध्या नागरिकांना अनेक हाल सोसावे लागत आहे.

बल्लारपूर वेकोली क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती गावात सध्या पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई उदभवली आहे, मात्र मनसेच्या तटस्थ भूमिकेमुळे वेकोलीला माघार घेत पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवावा लागला.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर वेकोली क्षेत्रातील सास्ती गावात नागरिकांना अनेक दिवस पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने भर उन्हात त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
विशेष म्हणजे सास्ती गाव बल्लारपूर वेकोलीने दत्तक घेतलेले गाव आहे.

याबाबत मनसे विधी विभागाच्या जिल्हाध्यक्ष ऍड. मंजू लेडांगे यांना सास्ती गावातील नागरिकांची तक्रार प्राप्त झाल्यावर त्यांनी सरळ बल्लारपूर वेकोलीचे मुख्य महाप्रबंधक डे यांची भेट घेतली, मात्र भेट घेतल्यावर डे यांनी अनेक प्रश्नांच्या उत्तरांची दिशा बद्लविण्याचे काम केले.

मात्र नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, सास्ती गावातील रस्ते सीएसआर निधीतून निर्माण करावे अशी मागणी ऍड. लेडांगे यांनी मुख्य महाप्रबंधक यांच्यापुढे ठेवली, आधी वेकोली चे महाप्रबंधक मनसे शिष्टमंडळाचे काही एक ऐकायला तयार नव्हते मात्र मनसेचा हिसका दाखविल्यावर डे यांनी माघार घेत, गावात आजपासून नागरिकांना टँकर द्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असे आश्वासन दिले.

गावातील रस्त्यांची कामे सीएसआर निधीतून लवकरचं केल्या जाणार या मागणीवर सुद्धा मुख्य महाप्रबंधक डे यांनी होकार दर्शविला.
मनसे विधी विभागाच्या जिल्हाध्यक्ष ऍड. मंजू लेडांगे यांच्या पहिल्या भेटीत गावातील समस्यांचे निराकरण करीत आज पाण्याचा टँकर सास्ती गावातील विविध भागात पोहचल्याने गावकऱ्यांनी ऍड. लेडांगे यांचे मनापासून आभार मानले.