चंद्रपूर-मूल मार्गावर लागली वाहतुकीची रांग

वाहतूकीचा खोळंबा

News34 chandrapur गुरू गुरनुले

मुल – मुल चंद्रपूर हायवे मार्गावर मुल शहरापासून दोन की.मी.अंतरावर असलेल्या रेल्वे फाटकावर लावलेल्या उंच गेटला मशनरी घेऊन जाणारा लोडेड ट्रक अडकल्याने रेल्वे फाटकपासून चंद्रपूर रोड जानाळा चार की.मी अंतराची सर्वच ट्रॅफिक वाहणांची रांग लागली. आणि रेल्वे फाटकापासून ते मुल शहराकडे येणारी ट्रॅफिक स्टेट बँक समोरील देशकर इंजिनिअरिंग वर्क्स शाप पर्यंत १ की.मी. अंतरावरची ट्रॅफिक रांग असल्याने दोन्ही कडे जाणारी येणारी वाहने सकाळी ७ वाजेपासून तर १२ वाजेपर्यंत अडली. त्यामुळे दोन्ही बाजूला जाणारे येणारे सर्व चारचाकी मोठी लहान वाहने, दुचाकी, ऑटो, ट्रक अशी वाहने अडल्याने जाणारे येणारे यांचे आजचे नियमित जनजीवन विस्कळित झाले आहे. Traffic jam in chandrapur

आजच्या स्थितीत विद्यापिठाच्या परीक्षा सुरु असल्याने रेल्वे फाटकाला लागूनच असलेल्या कर्मवीर महाविद्यालयात परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचासाठी मोठी कसरत करावी लागली. एवढेच नव्हेतर चंद्रपूरला परीक्षा देणारे विद्यार्थी सुद्धा असल्याने त्यांनाही चीरोली मार्गे चंद्रपूरला जावे लागले. याच मार्गावर कॉलेज ग्राऊंडवर भाजीपाला खरेदी विक्री करणाऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागला. त्यामुळे आजच्या तारखेत काही महत्वाचे कामे करता आली नाही. त्यामुळे या मार्गवर नेहमी जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांची फार मोठी तारांबळ उडाली. यापूर्वीही याच ठीकानी याच मार्गावर मागील वर्षात अशीच एकदा मोठी ट्रॅफिक अडून पडली होती. त्यामुळे मुख्य हायव्हेच्या ठिकाणी मागील वर्षी सुद्धा रेल्वे फाटकावर मोठ्या बाईक, ट्रॅक्टर ट्रक, मेत मेट्यडोर दुचाकी,चारचाकी सर्व प्रकारची वाहने व जाणारे येणारे नागरिक असल्याने रेल्वे फाटकावर उड्डाण पूल शासनाने त्वरित मंजूर करावे अशी असंख्य जनतेची मागणी पुढे आली आहे.

कारण मागील एक वर्षापूर्वी याच ठिकाणी अशीच लांब रांगेची एक तासासाठी संपूर्ण वाहतूक अडली होती. तीच पुनरावृत्ती आज झाली आहे. नागरिकांच्या मागणीकडे शासनाने व लोक प्रतिनिधीने लक्ष द्यावे अशी विनंती सुद्धा केली आहे.