लोकसभेचा हिशोब चुकता करणार – हंसराज अहिर

महाजनसंपर्क अभियानाला यशस्वी करा - हंसराज अहिर

News34 chandrapur

चंद्रपूर/यवतमाळ:-  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजवटीला 30 मे रोजी 9 वर्षे पूर्ण होत असून या 9 वर्षांत 40 वर्षांच्या सत्ताकाळाला लाजविणारे कार्य भाजपा राजवटीत घडले. समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर उंचावण्याचे कार्य प्रधानमत्र्यांनी केले. या लोकाभिमुख व राष्ट्रोन्नतीच्या योजनांची उपलब्धी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरीकांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. Chandrapur loksabha

आगामी सर्व निवडणूका जिंकण्यासाठी व लोकसभेचा हिशेब चुकता करण्यासाठी जनसंपर्क महाअभियान यशस्वी करुन देश तोडणाऱ्या शक्तींना सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी सर्वांनी झोकून द्यावे असे आवाहन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री व चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे संयोजक हंसराज अहीर यांनी केले.

दि 26 मे रोजी शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे पार पडलेल्या मोदी@9 जनसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीस ते संबोधित करीत होते. या बैठकीस चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील वणी चे आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार संजय धोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, खुशाल बोंडे, संध्याताई गुरनुले, अल्का आत्राम, अंजली घोटेकर, संजय गजपूरे, नामदेव डाहुले यांचेसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना अहीर यांनी प्रत्येक बुथस्तरावर पोहचण्याचा प्रयत्न करीत कामाला लागावे अशा सुचना केल्या.

मागील 9 वर्षांत नरेंद्र मोदी जी यांनी शेकडो योजनांच्या माध्यमातून देशातील कोट्यवधी लोकांना लाभ मिळवून दिला आहे. या सर्व योजना जिल्ह्यातील सर्व जातीधर्माच्या लोकांपर्यंत पोहचल्या असून या लाभार्थ्यांना मोदींच्या लोकाभिमुख कार्याचा परिचय देण्यासाठी सर्वांनी प्रत्येक घराघरा पर्यंत पोहचून मोदी @9 च्या विकासाचा आराखडा मांडावा असेही त्यांनी यावेळी सांगीतले.

2023-24 हे निवडणूकांचे वर्ष असून जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, नगर पंचायत व अन्य निवडणूका होत असल्याने या सर्व ठिकाणी भाजपाची सत्ता स्थापण्यासाठी अहोरात्र कष्ट घ्यावे लागतील तेव्हाच सत्ता काबिज करणे शक्य होईल असेही हंसराज अहीर यांनी कार्यकर्त्यांना सुचना केली. मोदी राजवटीची 9 वर्ष हे महाजनसंपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजनबध्द कार्यक्रमाचे आयोजन करावे असे सुचित केले.