मुंबईत धनोजे कुणबी समाजाच्या वसतिगृहाचे लोकार्पण

चंद्रपुरातील पत्रकाराचा विशेष सन्मान

News34 chandrapur

मुंबई : धनोजे कुणबी समाजातील गरीब तसेच गरजु विद्यार्थ्यांसह एमपीएसई, युपीएसईच्या विद्यार्थ्यांना मुंबई राहण्याची सुविधा व्हावी, त्यांना कोणताही अडचण येऊ नये यासाठी धनोजे कुणबी विकास संस्था, ठाणेच्या वतीने पनवेल येथे लोकसहभागातून वसतीगृहाचे संस्थेचे अध्यक्ष प्रशांत आगलावे यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले.

यावेळी संस्था सचिव दत्तू पावडे, कोषाध्यक्ष अनुश्री दुर्गे, उपाध्यक्ष विलास राजूरकर, सहसचिव आशिष ठाकरे, अक्षय बोथले, पुरुषोत्तम बेलेकर, विजय कोल्हेकर, पंकज अतकरी, कोमल बल्की, साईनाथ कुचनकार, उदय दुर्गे, पुरुषोत्तम बेलेकर यांच्यासह सदस्य तसेच समाज बांधवांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाप्रसंगी विशेष सहकार्यासाठी विजय कोल्हेकर, साईनाथ कुचनकार यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना संस्थाध्यक्ष प्रशांत आगलावे म्हणाले, मुंबईमध्ये धनोजे कुणबी समाजाचे वसतीगृह नव्हते, त्यामुळे विदर्भासह अन्य ठिकाणाहून समाजातील विद्यार्थ्यांना येथे आल्यानंतर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

आम्ही मुंबईत आलो तेव्हा आम्हालाही हा त्रास झाला. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून मुंबईत धनोजे कुणबी समाजाचे वसतीगृह असावे, असे ठरविले आणि समाजातील दानशुरांच्या माध्यमातून अनेक वर्षांपासूनचे समाजातील बांधवांचे स्वप्न पूर्ण झाले. या वसतीगृहामध्ये गरीब, तसेच गरजू विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष विलास राजुरकर, अनुश्री दुर्गे यांच्यासह अन्य उपस्थित समाजबांधवांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अक्षय बोथले यांनी तर आभार दत्तू पावडे यांनी मानले. यावेळी राम मत्ते, संजय मत्ते, राजेंद्र टोंगे, डाॅ. मोनाली बदकी, उमेश धांडे, देवेंद्र गौरकार, नरेश गिरसावळे, पांडूरंग जरीले, सुनिल बल्की, रोहण सोनटक्के, भावना पावडे, किरण आगलावे, सरिता राजुरकर, संपदा मोवाडे, करिष्मा खापने, वंदना गायकवाड, राम गायकवाड, अभय, अतकरी, मंजुषा धांडे, प्रज्वल जोगी, मुकूंद काकडे, डाॅ. पंकज अतकरी आदींची उपस्थिती होती.