News34 chandrapur
चंद्रपूर – मूळ भारतीय असून आपल्या परिसरातील लोकांकरिता अंशीक का होईना योगदान स्वरूपात श्री व सौं शिल्पा तगपल्लेवार दाम्पत्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्याने चंद्रपूरातील 100 युवती,स्त्री पुरुषांना कडक उन्हाळ्या निमित्याने दुपट्टा व स्कार्फ, रुमालाचे वितरण अलीकडेच करण्यात आले सोबत मिष्ठान्न भोजनाचा ही लाभ घडवीला.
आपल्या मायभूमीतील नागरिकांसाठी दिलेल्या अनुपम भेट व योगदाना बद्दल विकलांग सेवा संस्थेच्या वतीने व लाभार्थ्यांनी श्री.संदिप तगलपल्लेवार यांना वाढदिवस मंगल अभिष्टचिंतन करुन त्यांचे दीर्घायुष्याची प्रार्थना, शुभेच्छा दिल्यात. सध्या हे दाम्पत्य केमन आयलन्ड मध्ये राहत आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवराव कोंडेकर, खुशाल ठलाल, अशोक खाडे, संजय डाखोरे प्रसाद पान्हेरकर, राजश्री शिंदे, माया दुपारे, शिवानी बोबडे, पूजा पान्हेरकर, राखोंडे, शोभा खोडके ह्यांनी मौलिक सहयोग दिला असल्याचे विकलांग सेवा संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे.