चंद्रपूर लोकसभेचे खासदार यांची तब्येत कशी आहे? हेल्थ बुलेटिन

हेल्थ अपडेट

News34 chandrapur

चंद्रपूर/दिल्ली – चंद्रपूर लोकसभेचे खासदार बाळू धानोरकर हे दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट आली आहे.

सध्या खासदार धानोरकर हे व्हेंटिलेटरवर आहे, रुग्णालयातील डॉक्टर्स बाळू धानोरकर यांच्यावर उपचार करीत आहे.

2 दिवसांपूर्वी धानोरकर यांचे किडनी स्टोन वर उपचार करण्यात आला होता, मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली, त्यांना तात्काळ air ambulance ने नागपूर वरून दिल्ली मध्ये हलविण्यात आले.

खासदार धानोरकर बरे व्हावे यासाठी अनेक कार्यकर्ते प्रार्थना करीत आहे.

सध्या कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.