वाढदिवसाच्या दिवशी श्रद्धांजली चा कार्यक्रम

बाळू भाऊ साठी काय पण

News34 chandrapur

चंद्रपूर : प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की आपला जन्मदिवस किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचा जन्मदिवस हा मोठ्या उत्साहात साजरा व्हावा. अशाच उत्साहात आप चे पदाधिकारी राजु कुडे यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत आपचे कार्यकर्ते असताना काल बाळू भाऊ धानोरकर यांचा निधनाने संपूर्ण जिल्ह्यात शोकाकुल असताना आप चे राजु कुडे यांनी आपल्या वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द करून विद्यमान खासदार स्व. बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचा श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला.

राजू कुडे यांचा मित्र परिवार तसेच आप चे कार्यकर्ते यांनी 1 मिनिटाचा मौन बाळगून श्रध्दांजली देत त्यांचा जीवनावर प्रकाश टाकला यामध्ये एक व्यक्तीने जर मनात आणले तर तो कोणत्याही पदावर जावू शकते याचे उदा. म्हणजे बाळु भाऊ धानोरकर ते सर्वसाधारण कार्यकर्ते, पदाधिकारी पासून ते आमदार, खासदार या पदा पर्यंत यशस्वी झेप घेत इतरापुढें एक संदेश देण्याचे काम केले आहेत असे मत उपस्थितांमध्ये आप चे जिल्हा सचिव संतोष दोरखंडे यानी केले.

तर आभार प्रदर्शन स्वतः राजु कुडे यांनी केले . यावेळेस आपचे शहर अध्यक्ष योगेश गोखरे, रहेमान खान पठाण सघटक, युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे, सुधीर पाटील, स्वप्निल घागरगुंडे, योगेश मुऱ्हेकर, अनुप तेलतुंबडे, वीरू भाऊ खोब्रागडे, राजू भाऊ तोडासे, जयदेव देवगडे, अजय बाथव, विशाल रामगिरवार, सुशांत धकाते, कार्तिक बल्लावार, विनोद पेनलीवार, सहील गुरपूडे, अविनाश उराडे, सागर ढोरे, जस्मिन शेख, जितेंद्र भाटिया, पंकज तेलसे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी मित्र परिवार उपस्थित होते.