सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या या वेबसाईटवर बंदी घाला

अन्यथा आंदोलन करणार

News34 chandrapur गुरू गुरनुले

मूल – क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या इंडिक टेल्स, आणि हिंदू पोस्ट, बाईटवर बंदी आणुन लेखकांवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा (अ. भा. महात्मा फुले समता परिषद चंद्रपूर (पूर्व) प्रा. विजय लोनबले व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आला.

इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेला आहे. शरयु ट्रस्ट नावाची संख्या इंडिक टेल्स ही वेबसाईट चालवते. सावित्रीआईची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना मुली पुरविण्याची सांग, अशी मांडणी या वेबसाईटवरील लेखामध्ये करण्यात आली आहे.

सावित्रीमाई फुलेंच्या कामाबद्दल इंडिक टेल्स च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. शिव-फुले-शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीआईची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि सामाजिक भावना दुखावणारे असून, त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.

कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावं आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगडे शेणाचे प्रहार आपल्या अंगावर झेलले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केले. या क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्याबद्दल आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तीकडून प्रहार केला जात आहे.

एकविसाव्या शतकात सुध्दा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करीत आहे.
या पोर्टलवर इतिहासाची पुनमांडणी या नावाखाली अक्षरश: इतिहासाची मोडतोड सुरु आहे. ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे.

तरी सावित्रीबाई फुलंच्या बदनामी यातना हा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपाह लेख लिहिणाऱ्या
इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईटवर आणि लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी.

अन्यथा रस्त्यावर उतरुन तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी म. फुले समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. विजय लोनवले, महिला जिल्हा कार्याध्यक्षा सौ. शशिकला गावतूरे, ज्येष्ठ मार्गदर्शक माजी जि.प.सदस्य प्रा. रामभाऊ महाडोरे, समता परिषेदेचे प्र प्र.. युवराज चावरे, माजी प.स. सदस्य डॉ. पद्माकर लेनगुरे, माजी नगराध्यक्ष श्री. वासुदेवराव लोनबले, श्री. नामदेवराव गावतुरे, श्री. अनिलभाऊ सोनुले सरपंच श्री. सुनिल काळे, डॉ. शाम गेडाम, प्रशांत उराडे, दिपक महाडोळे, विक्रांत मोहूरले राकेश मोहुर्ले, प्रदिप वाढई, रोहित निकुरे, महेश जेंगठे, प्रा. बि.डी. ताडे, प्रा. चक्रधर पाँगडे, परशुराम शेन्डे, दुषांत महाडोळे, प्रकाश लेंनगूरे, सौ. शारदा शेन्डे, सौ.सिमाताई लोनबले, सौ. संगिता ढोले, श्रीमती शालु गुरनूले सी. ओमलता लेनगरे, धनराज मोहूल, वासुदेव नागोशे, अनिल वाढई, रुपीदेव नागोशे, स्वप्नील बुरांडे, सुधार लेनगरे, योगेश लेनगरे, छगन लेनगरे, महादेव वढई, संजय मोहुर्ल, प्रविण लोनबले, उर्वशी सोनुले, मोनिका गावतुरे, अंजली चौधरी, माधुरी गुरनुले, आस्था लेनगरे, संदीप मोहले, तुषार लेनगरे, मुलीधर वाढई, सुवद लोनबले तसेच समता परिषदेचे अनेक पदाधिकारी महिला कार्यकर्ते उपस्थित होते.