चंद्रपूर महिला कांग्रेसच्या वतीने खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली

श्रद्धांजली कार्यक्रम

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे एकमेव लोकप्रिय खासदार स्व.बाळूभाऊ धानोरकर यांचे नुकतेच 30 मे रोजी वयाच्या 47 व्या वर्षी दुःखद निधन झाले.

बाळूभाऊ धानोरकर याच्या निधनामुळे चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. या दुःखातून सावरण्यासाठी आणि बाळूभाऊ यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस च्या वतीने सौ चंदाताई वैरागडे यांच्या नेतृत्वात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीबाई फुले शाळा बाबूपेठ च्या पटांगणात करण्यात आले.

यावेळी स्व.बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करून सर्व उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

याप्रसंगी डॉ.अभिलाशा गावतुरे, माजी नगरसेवक श्री गोपाल अमृतकर,माजी नगराध्यक्ष सौ सुनिता लोढिया ,माजी महापौर सौ संगीता अमृतकर,प्राचार्य नरेंद्र बोबडे, दिवाकरजी पुद्दटवार ,इत्यादींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.आयोजक सौ. चंदाताई वैरागडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना स्व.बाळूभाऊ हे आमचे आधारस्तंभ होते. माझ्या सारख्या सामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तीला महिला अध्यक्ष म्हणून कार्य करण्याची संधी दिली.तसेच माझ्या पतसंस्थेच्या उदघाटन प्रसंगी स्वतः आणि आमदार प्रतिभाताई उपस्थित राहून आमच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

इतकेच नव्हे तर त्यांनी बाबूपेठ मधील अनेक समस्या स्वतः पुढाकार घेऊन मार्गी लावल्या,तसेच भविष्यात सुद्धा बाबूपेठ च्या विकासासाठी निश्चित च ते सहकार्य करणार होते. पण आज ते आपल्यात नाही हे दुःख असह्य होत आहे.या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी उपस्थितांमध्ये अत्यंत भावूक वातावरण निर्माण झाले, शेवटी स्व.बाळूभाऊ धानोरकर यांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी सर्वांनी उभे राहून दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी माजी नगरसेविका वीणा खनके,अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा अध्यक्ष निशा धोंगळे मीनाक्षी गुजरकर,मुन्नी शेख,तसेच बाबूपेठ परिसरातील माजी नगरसेवक,स्नेहल रामटेके,हनुमान चौखे, सोबतच राहुलभाऊ चौधरी, महेशभाऊ मेकलवार,विवेकभाऊ पोतनूरवार,अजयभाऊ दुर्गे, राजू कुडे,अनिलभाऊ तुंगीडवार, गुंजन येरमे, चंद्रशेखर मैलारपवार, भागवत पगाडे,रवींद्र चिडे,सुरेश वैरागडे,उमंग हिवरे, संजय वैरागडे, भाऊराव येसेकर, यांच्या सह काँग्रेस कार्यकर्ते, रणरागिणी महिला पतसंस्थेच्या पदाधिकारी,महिला बचत गट सदस्या, सोबतच बाबूपेठ परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.