अजित पवार यांनी खासदार धानोरकर यांच्या आठवणींना दिला उजाळा

सांत्वनपर भेट

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे कांग्रेस पक्षाचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं 30 मे ला अकाली निधन झालं होत, आज 3 जून ला राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी धानोरकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खासदार बाळुभाऊ धानोरकर यांना श्रद्धांजली वाहिली. दिवंगत खासदार यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांची व कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या आठवड्यात राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष शरद पवार धानोरकर यांच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे.