News34 chandrapur
चंद्रपूर – आपत्कालीन परिस्थिती मध्ये मदत हवी असल्यास 112 क्रमांक नागरिकांना डायल करावा लागेल, ही सेवा संपूर्ण देशात उपलब्ध झाली आहे, या सेवेचा अनेकांनी वापर केला असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या आपत्कालीन क्रमांकाने चंद्रपुरातील एका नागरिकांची हरविलेली बॅग तात्काळ मिळाली आहे, 24 मे ला सायंकाळी 6 ते 7 वाजताच्या सुमारास नांदा फाटा कोरपना येथे राहणारे योगेश पूट्टावार यांची बॅग बस प्रवासादरम्यान हरविली.
बॅग न दिसल्याने योगेश यांनी आपत्कालीन क्रमांक 112 डायल करीत आपली समस्या सांगितली, याबाबत चंद्रपूर पोलिसांच्या डायल 112 प्रतिसादक पोलीस कर्मचारी धर्मेंद्र रामटेके व राहुल बनकर यांनी तात्काळ बस स्टॉप येथे पोहचत बस क्रमांक Mh14hb8823 ला थांबवित योगेश यांनी दिलेल्या वर्णनाच्या बॅग चा शोध घेतला असता ती बॅग बसमध्ये आढळली.
त्या बस मध्ये 2 हजार रुपये रोख व योगेश च्या मित्रांचे स्पोर्ट्स सर्टिफिकेट होते, योगेश यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत हरविलेली बॅग शोधल्यामुळे योगेश ने चंद्रपूर पोलिसांच्या डायल 112 प्रतिसादक चमूचे आभार मानले.
संकट कसले ही असो आपत्कालीन परिस्थितीत मध्ये 112 क्रमांक डायल करावे असे आवाहन चंद्रपूर पोलिसांच्या वतीने करण्यात आले.