चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णसेवक जीवन तोगरे यांची हत्या?

पोलिसांचा तपास सुरू

News34 chandrapur

जिवती – तालुक्यातील रुग्णसेवक जिवन तोगरे रा. पाटागुडा वय चोवीस वर्ष हा युवक गुरुवार पासून बेपत्ता होता. घरच्यांनी तीन दिवसापासून त्याची नातेवाईक व मित्र परिवार कडे शोधाशोध केली मात्र आज रविवारी सकाळीच शेनगाव व मरकागोंदी च्या मधील जंगलात एका झाडाखाली नागरिकांना त्यांचा मृतदेह आढळला.

जिवन हा समाज सेवेचा पदवीधर होता.त्याने अनेक रक्तदान शिबिरे आयोजित केली होती. रुग्णाच्या सेवेला धाऊन जाणारा होता.कधी कुण्या रुग्णाला रक्ताची गरज पडो की कुठली अडचण पडो तो धावून जायचा.

राजकीय व सामाजिक क्षेत्रात तो जनसामान्यांचा आवाज होता. जिवन हा आईला तालुक्याच्या ठिकाणी आता जाऊन येतो म्हणून सांगून आला होता. मात्र आज त्याचा मृतदेह सापडला. विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वी एका महिलेने दोघात वाद झाल्याची जिवन वर पोलिस स्टेशन जिवती येथे तक्रार केली होती. त्यामुळे आमच्या मुलाची हत्याच आहे याचा तपास व्हावा. अशी मागणी जिवन चे नातेवाईक आणि समाज बांधवांकडून केली आहे.

जीवन सोबत त्याचे कागदपत्रे आणि त्याचा बंद मोबाईल सापडला आहे. शव विच्छेदन हे घटना ठिकाणी झाले असून त्याचे रिपोर्ट दोन दिवसात पूर्ण होईल असे पोलिस प्रशासनाने सांगितले.

जीवन च्या शरीरावर काही वार झाल्या अश्या खुणा आढळून आल्या आहे, नेमकं त्याठिकाणी काय झालं हे पोलीस तपासात निष्पन्न होणार.

घटनेचा अधिक तपास पिटिगुडा उप पोलिस स्टेशन चे ठाणेदार आवारे साहेब आणि त्यांची चमू करीत आहेत.