प्रदूषणावर आळा घाला वंचित आघाडीची गांधीगिरी

वंचित बहुजन आघाडीचा वेकोलीला इशारा

News34 chandrapur

चंद्रपूर – बल्लारपूर व राजुरा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी असून कोळसा खाणीमुळे व कोळसा वाहतुकीमुळे जवळपासच्या गावात मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ झाली आहे.त्यामुळे प्रदूषणावर आळा घाला अन्यथा वेकोली कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी दिला आहे. तसे निवेदन वेकोलीच्या महाप्रबंधकाना देण्यात आले आहे.

सास्ती, रामपूर व लगतच्या गावात तसेच शेतात मोठ्या प्रमाणात वेकोलीच्या ब्लास्टिंगमुळे नागरिकांचे नुकसान होत आहे.तसेच ट्रकद्वारे कोळसा वाहतूक होत असून प्रदूषणात वाढ झाली आहे.प्रदूषणावर आळा घालावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 11 फेब्रुवारी ला वेकोलीच्या महाप्रबंधकाला निवेदन देण्यात आले होते.

मात्र अजूनही वेकोलीने याकडे लक्ष दिले नाही.ही बाब वेकोली प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी वंचितचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी वेकोली महाप्रबंधकाना झाडाचे रोपटे व मास्क भेट देत निवेदन दिले. येत्या सात दिवसात प्रदूषणावर आळा न घातल्यास वेकोली कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा भूषण फुसे यांनी दिला आहे.यावेळी राजुरा तालुका उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, महेंद्र ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते लखन अडबाळे आदींची उपस्थिती होती.