News34 chandrapur
मध्यप्रदेश – देशातील महिलांचे सर्वात आवडते स्ट्रीट फूड म्हणजे पाणीपुरी, गुपचूप व गोलगप्पे याचा अर्थ एकचं होतो, मात्र देशात असे एक ठिकाण आहे जिथे महिलांना पाणी पुरी खाण्यास मनाई आहे, विशेष म्हणजे ती पाणीपुरी फक्त पुरुषांसाठी आहे.
देशातील प्रत्येक राज्य, जिल्हा व तालुक्यातील प्रत्येक गल्ली बोळात पाणीपुरीचे दुकान सहज आढळून येते, अनेक ठिकाणी महिला व मुली पाणीपुरीवर ताव मारताना दिसतात.
आता तर पाणीपुरी लग्न समारंभात सुद्धा सहजपणे उपलब्ध होते, पण मध्यप्रदेशातील ग्वाहलेर मध्ये पाणीपुरी फक्त पुरुषांसाठी उपलब्ध आहे, त्या आशयाचा बॅनर सुद्धा दुकानाबाहेर लावण्यात आला आहे, बॅनर बघताच महिला व मुली निराश होऊन परत जातात.
कारण काय?
ग्वाहलेर मधील कांचमील परिसरात असलेल्या या दुकानात पाणीपुरी फक्त 18 वर्षे वयोगटाच्या वरील मुलांना व पुरुषांना दिली जाते, यामागील कारणही तितकेच खास आहे.
दुकांनचालक गिरीराज सिंह भदोरीया म्हणतात की आम्ही तयार केलेल्या पाणीपुरी मध्ये विशेष प्रकारचे मसाले टाकले जातात त्यामुळे पाणीपुरी मध्ये मोठ्या प्रमाणात तिखटपणा वाढतो, तो तिखटपणा महिला व मुली सहन करू शकत नाही म्हणून ही पाणीपुरी केवळ पुरुषांना दिली जाते.