News34 chandrapur
चंद्रपूर – 30 मे 2023 ला जिल्ह्याचे खासदार बाळू धानोरकर यांचं अचानक निधन झाले, त्यांच्या निधनाला 13 दिवस पूर्ण होत नाही त्यावेळी विरोधकांनी कांग्रेस संपली असा दावा केला, बाळू भाऊ यांच्या निधनाने कांग्रेसचे चंद्रपुर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले, कारण संपूर्ण महाराष्ट्रात बाळू भाऊ धानोरकर हे कांग्रेस पक्षाचे एकमेव खासदार होते.
बाळू भाऊ गेले तर आता पुढे काय? कांग्रेस पक्षाचे काय होणार? असा प्रश्न कांग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या मनात निर्माण झाला असेलच.
चंद्रपूर जिल्ह्यातील कांग्रेसला अनेकदा अंतर्गत राजकारणाचा फटका बसला आहे, पुढेही परिस्थिती अशीच राहणार मात्र आमदार प्रतिभा धानोरकर या सर्व अडचणीला सामोरे जात त्यावर मात करणार अशी आशा कांग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
खासदार धानोरकर यांच्या निधनाने कांग्रेसचे जे नुकसान झाले ते कधी ही भरून न निघणारे आहेत मात्र आता कांग्रेस पक्षातील कार्यकर्ता ते पदाधिकारी बाळू धानोरकर यांचं जिल्हा कांग्रेसमय करण्याच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचे ध्येय मनात बाळगून काम करणार आहे.
लोकसभेची पोटनिवडणुक लागल्यावर काय होणार?
सध्या बाळू भाऊ यांच्या जाण्याने जिल्हा पोरका झाला, लोकसभेची पोटनिवडणूक लागणार असण्याची चिन्हे निर्माण झाली आहे, त्यासाठी अनेकांनी उमेदवारीचे बाशिंग बांधून तयारी सुद्धा केली आहे, पण आमदार प्रतिभा धानोरकर या लोकसभेच्या पोटनिवडणूकीच्या रणांगणात उतरल्या तर ही निवडणूक त्या निर्विरोध जिंकणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.
बाळू भाऊ धानोरकर यांचे सर्व पक्षातील नेत्यांसोबत राजकारणा पलीकडील मैत्री होती, त्या मैत्रीला विरोधक तडा न जाऊ देत लोकसभेची पोटनिवडणूक ही निर्विरोध केल्या जाईल.
सध्या कांग्रेस पक्षात अनेक दिग्गज नेते आहे, माजी पालकमंत्री व आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर व चंद्रपुरातील जिल्हा शहर अध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वाला कार्यकर्त्यांचा मनापासून पाठिंबा आहे. सोबतच आगामी निवडणुकीत कांग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी खासदार नरेशबाबू पुगलीया यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
येणाऱ्या मनपा निवडणुकीत कांग्रेस पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी सोबत मनपावर विजयाचा झेंडा फडकविणार यासाठी तयारीला लागली आहे.