चंद्रपूर जिल्ह्यात मनसे ला मोठा हादरा

मनसे ला धक्का

News34 chandrapur

चंद्रपूर – वर्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसे पक्षाचे उमेदवार रमेश राजूरकर यांनी तब्बल 33 हजार मते घेत प्रस्थापित पक्षांना धक्का दिला होता, मात्र आता राजूरकर यांनी निवडणुकीच्या एक वर्षांपूर्वी भाजप पक्षात प्रवेश घेत मनसे ला धक्का दिला.

महाराष्ट्र विधानसभा वर्ष 2019 च्या निवडणुकीत ऐनवेळी उद्योजक रमेश राजूरकर यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मनसे पक्षात एन्ट्री करीत थेट विधानसभा निवडणूक लढली, पहिल्यांदा निवडणूक लढवीत त्यांनी 33 हजार मते घेतली होती.

विधानसभा निवडणुकीनंतर रमेश राजूरकर यांनी वरोरा विधानसभेत मनसे पक्षाची बांधणी केली, त्यांचे कार्य बघता मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे राजूरकर यांच्या निवासस्थानी भेटायला आले होते.

वर्ष 2024 मध्ये मनसे पक्षाचा चंद्रपूर जिल्ह्यात पहिला आमदार निवडून येणार अशी शक्यता वर्तविली जात असताना राजूरकर यांनी भाजप पक्षात उडी घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का लागला आहे.

नुकतेच खासदार धानोरकर यांच्या निधनानंतर वरोरा विधानसभेच्या आमदार प्रतिभा धानोरकर या लोकसभा पोटनिवडणुकीत उभ्या होणार असल्याची चर्चा रंगली होती, जर असे झाले तर वरोरा विधानसभेवर भाजप बाजी नक्की मारणार असे चिन्ह राजुरकर यांच्या प्रवेशाने निर्माण झाले आहे.

राजूरकर यांना भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरोरा विधानसभा प्रमुखाची जबाबदारी सोपविली आहे.