News34 chandrapur
चंद्रपूर – राज्यातील तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना नुकतीच पदोन्नती देत पद स्थापना देण्यात आली आहे, यापैकी अनेक नवे अधिकारी चंद्रपूर जिल्ह्यात रुजू झाले आहे.
महसूल व वन विभागाच्या 5 जून ला निघालेल्या आदेशात नव्या अधिकाऱ्यांची नावे व पद स्थापना निर्गमित करण्यात आली आहे.
गोंडपीपरी विभागात सुनील दत्तात्रय शिंदे हे उपविभागीय अधिकारी, अतुल जटाळे चंद्रपूर जिल्हा पुनर्वसन अधिकारी, उप जिल्हाधिकारी भूसंपादन चंद्रपूर दगडू कुंभार, किशोर घाडगे उपविभागीय अधिकारी चिमूर, रवींद्रकुमार माने उपविभागीय अधिकारी राजुरा, अजय प्रभाकर चरडे जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर या पदी वर्णी लागली आहे.