News34 chandrapur
मुंबई – राज्यात आज राष्ट्रवादी कांग्रेसतर्फे जेल भरो आंदोलन आहे, मात्र आज राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहे.
राजकारण महाराष्ट्र या ट्विटर खात्यावरून शरद पवार यांना तुझा दाभोलकर करू अशी धमकी देण्यात आली असून खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली असून यावर लवकर कारवाई होण्याची चिन्हे आहे.