News34 chandrapur
चंद्रपूर : वरोरा उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात, वरोरा व भद्रावती तालुक्यातील एकूण 88 गावात पोलीस पाटील पद भरतीकरीता अहर्ताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
अहर्ताधारक उमेदवारांनी https://warora.ppbharti.in या संकेतस्थळावर दि. 7 जून ते 23 जून 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. पोलीस पाटील पदाकरिता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन वरोराच्या उपविभागीय दंडाधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांनी केले आहे.