चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णसेवक जीवन तोगरे चा मृत्यू कसा झाला?

काय आहे मृत्यूमागिल रहस्य?

News34 chandrapur

जिवती – तालुक्यातील रुग्णसेवक जिवन तोगरे रा. पिट्टीगुडा वय 24 वर्ष हा युवक गुरुवार 1 जून पासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी जीवन चा सर्वत्र शोध घेतला मात्र तो कुठेही आढळून आला नाही, 4 जून ला शेणगाव व मरकागोंदी च्या जंगलात जीवन चा मृतदेह सापडला, त्याची हत्या झाली असा कुटुंबाने आरोप केला होता, मात्र आता त्याचा मृत्यू कसा झाला यावर सध्यातरी प्रश्नचिन्ह उपस्थित आहे.

 

जिवन हा समाजसेवेचा पदवीधर होता. त्याने अनेक रक्तदान शिबिरे आयोजित केली होती. रुग्णाच्या मदतीला तो नेहमी धावून जात होता. जिवन हा आईला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन येतो म्हणून सांगून आला होता.

विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वी एका महिलेने दोघात वाद झाल्याची जिवन वर पोलिस स्टेशन जिवती येथे तक्रार केली होती. त्यामुळे आमच्या मुलाची हत्याच करण्यात आली आहे असा सरळ आरोप कुटुंबीयांनी केला होता.

जीवन च्या मृतदेहाजवळ काही कागदपत्रे आणि त्याचा मोबाईल सापडला होता. जीवन च्या मृत्यूवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले, याबाबत पिट्टीगुडा पोलीस उपस्टेशनचे ठाणेदार आवारे यांच्याशी याबाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितले की जीवन चा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, म्हणून मृतदेहाचे शवविच्छेदन घटनास्थळी करण्यात आले होते, अजूनपर्यंत शवविच्छेदन चा अहवाल प्राप्त झाला नसून सध्यातरी याबाबत काही एक माहिती व अंदाल लावता येणार नाही, अहवाल प्राप्त झाल्यावर त्या दिशेने तपास केल्या जाणार.