चंद्रपुरात महिलांसाठी मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन केंद्राची सुरुवात

मनसेचा पुढाकार

News34 chandrapur

चंद्रपूर – आजच्या आधुनिक युगात सल्ल्यासारखी गोष्ट मोफत मिळत नाही, तो सल्ला मग कसलाही असो त्यासाठी आपल्याला शुल्क द्यावेच लागते, मात्र चंद्रपुरातील एका विधी तज्ञाने महिलांसाठी कायदेशीर सल्ले मोफत देण्याचे ठरवले आहे, आणि त्या सल्ला व मार्गदर्शन केंद्राची सुरुवात सुद्धा झाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधी विभाग जिल्हाध्यक्ष ऍड. मंजू लेडांगे यांच्या पुढाकाराने महिलांसाठी मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले.
सध्या महिला अत्याचारात झपाट्याने वाढ होत आहे, मात्र आपले अधिकार काय याबाबत अनेक महिलांना त्याची काही एक कल्पना नसते, पण लेडांगे यांच्या संकल्पनेतून ही समस्या सुद्धा आता दूर होण्यास महिलांना मदत मिळणार आहे.

सशक्त नारी शक्ती सुरक्षा, सल्ला व सन्मान उपक्रम अंतर्गत प्रत्येक शनिवार व रविवारी दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत दुर्गापुरातील वेकोली कॉलोनी NM 237 चंद्रपूर येथे ऍड लेडांगे या महिलांना मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन करणार आहे, याचा जिल्ह्यातील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.