अमिना घरून निघाल्या दिवस उलटला पण…

महिलेचा शोध सुरू

News34 chandrapur

चंद्रपूर – घरी क्षुल्लक वाद झाला आणि कुणालाही न सांगता महिला घराबाहेर पडली, मात्र दिवस लोटल्यावर सुद्धा ती महिला परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदविली.

चंद्रपूर शहरातील बाबूपेठ प्रभागातील जुनोना चौक येथील 66 वर्षीय अमिना हबीब शेख या आपल्या कुटुंबासमवेत राहतात.

3 वर्षीय मुलीचे अपहरण, रेल्वे पोलिसांचा तो तपास आणि…3 तासात तो मिळाला

 

16 जून ला घरी काही क्षुल्लक वाद झाला असल्याची माहिती असून त्या कारणाने अमिना या रागाच्या भरात सकाळी 11 वाजता घरून निघून गेल्या, दुपारपर्यंत त्या घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता त्यांची काही माहिती मिळाली नाही.

त्यामुळे शेख कुटुंबीयांनी याबाबत रामनगर पोलीस स्टेशन गाठत अमिना शेख बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली.

जर अमिना शेख कुणालाही आढळल्यास त्यांनी तात्काळ नबी हबीब शेख मोबाईल क्रमांक – 9975056345 सम्पर्क करण्याचे शेख कुटुंबीयांनी आवाहन केले आहे.