चंद्रपूर जिल्ह्यात रंगली या अनोख्या आंदोलनाची चर्चा

चंद्रपूर जिल्ह्यात अनोख्या आंदोलनाची चर्चा

News34 chandrapur

भद्रावती – वारंवार तक्रार करून देखील तहसीलदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने त्रस्त झालेला व्यक्ती हतबल होऊन अखेर तहसील कार्यालयाच्या परिसरातील झाडावर चढला आणि तिथून त्याने थेट गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा तहसीलदाराला दिला. त्यामुळे अखेर तहसीलदाराने तक्रारदाराच्या या आक्रमक पवित्र्यामुळे तलावातील गाळ काढण्याची परवानगी रद्द करण्याचे आदेश द्यावे लागले. हा प्रकार आहे भद्रावती तहसील कार्यालयातील. तर तक्रारदाराचे नाव गणेश जीवतोडे असे आहे.

कढोली गावातील सर्व्हे क्र. 21 आरजी 121 हेआर येथे मामा तलाव आहे. सरकारच्या मालकीचे असलेल्या या मामा तलावातील गाळ उपसा करण्याची परवानगी सतीश मडावी आणि मोरेश्वर दादाजी पातर या दोघांनी गाळ उपसा करण्याची परवानगी मागीतली होती. याला ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने विरोध केला. मात्र तहसीलदार अनिकेत सोनावणे याने तरीही मंजुरी दिली होती.

विशेष म्हणजे यासाठी 2 जून ला जनसुनावणी घेण्यात येणार होती मात्र त्याआधी तहसीलदार यांनी गाळ काढण्याची परवानगी देऊन काम सुरू केले होते, तहसीलदार यांच्या या भूमिकेमुळे प्रशासनाचा महसूल सुद्धा बुडाला.

जीवतोडे यांच्या मागणीला प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले त्यामुळे गणेश जीवतोडे यांनी 17 जून ला सकाळपासून तहसीलदार यांच्या कार्यालयापुढील झाडावर गळफास घेत आंदोलन सुरू केले.

गणेश जीवतोडे यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले व तहसीलदार यांना ती परवानगी रद्द करावी लागली.