News34 chandrapur
नागपूर – राज्यात सध्या लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनेत वाढ झाली आहे मात्र नागपुरा एक अशी घटना घडली की त्या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरुन गेले.
नागपूर शहरातील फारुखनगर भागातील 3 लहान मुले खेळायला घराबाहेर पडली, 4 वर्षीय तौफिक फिरोज खान, 6 वर्षीय आलीया फिरोज खान व 6 वर्षीय आफरीन इर्शाद खान हे तिघेही एकत्र शनिवारी दुपारी खेळायला घराबाहेर पडले, सायंकाळ झाली मुलं घरी परतली नाही.
खान कुटुंबीयांनी फारुखनगर भागात अनेक ठिकाणी चिमुकल्यांचा शोध घेतला मात्र ते तिघेही कुठंच आढळून न आल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
पाचपावली पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा फौज फाटा फारुखनगर भागात पोहचला, चिमुकल्याचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात झाली, मात्र कुणाच्याही नजरेस काही पडले नाही, इतक्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला खान कुटुंबियांच्या घराजवळ तब्बल 50 मीटर अंतरावर एक चारचाकी एसयूव्ही कार उभी दिसली, त्यामध्ये ते 3 चिमुकले त्या पोलीस कर्मचाऱ्याला दिसले.
तात्काळ तिघांना बाहेर काढण्यात आले मात्र तिघांचा मृत्यू झाला होता, तिघे खेळत असताना त्यांनी कारचा दरवाजा आतून बंद केला, तो दरवाजा कुणालाही उघडता आला नाही, उष्णतेमुळे तिघांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे.
तौफिक आणि आलिया हे दोघे भावंड होते तर आफरीन त्यांच्या शेजारी राहत होती, तिघांच्या मृत्यूने फारुखनगर भागात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.